ETV Bharat / state

नाथ बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक - farmers

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील 20 शेतकऱ्यांनी बँकेकडून व बचत गटांकडून व्याजाने पैशे घेऊन एप्रिल महिन्यामध्ये औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड बियाने कंपनीच्या (नाथ-05) भेंडीच्या वाणाची लागवड केली.55 ते 60 दिवसांत शेतकऱ्यांना भेंडीच्या फळाचे उत्पन्न अपेक्षित असताना तीन महिने उलटूनही पिक आले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नाथ बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक
author img

By

Published : Jul 8, 2019, 5:33 AM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील पांगरदरवाडी येथील शेतकऱ्यांची नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड औरंगाबाद येथील बियाणे कंपनीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. भेंडीची लागवड करुन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही भेंडीला फुले व फळे लागत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. शुक्रवार 5 जुलैला भेंडी प्लॉटची स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या ज्योतीराम जाधव व प्रमोद झाडगावकर या दोन कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संध्याकाळपर्यंत शेतात बसवून ठेवले. दोन दिवसांत कंपनीला अहवाल सादर करुन नुकसान भरपाई देण्याच्या हमीवर रात्री उशिरा कर्मचाऱ्यांची सुटका झाली.

नाथ बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील 20 शेतकऱ्यांनी बँकेकडून व बचत गटांकडून व्याजाने पैशे घेऊन एप्रिल महिन्यामध्ये औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड बियाने कंपनीच्या (नाथ-05) भेंडीच्या वाणाची लागवड केली. पाण्याची मुबलक व्यवस्था नसतानाही टँकरने पाणी घालुन शेतकऱ्यांनी भेंडीचे पीक जगवले. 55 ते 60 दिवसांत शेतकऱ्यांना भेंडीच्या फळाचे उत्पन्न अपेक्षित असताना तीन महिने उलटूनही पिक आले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे संबंधित कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व त्या कंपनीवर तात्काळ बंदी घालावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पांगरदरवाडी येथील 20 शेतकऱ्यांनी 30 एकरांवर भेंडीची लागवड केली होती. प्रति एकरी त्यांना आजपर्यंत 60 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीकडून महेश डोंगरे, लक्ष्मण जाधव, कुमार कदम, सोमनाथ जाधव, आबा गाटे, गोकुळ मते, यांच्या सह इतर शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.

Intro:नाथ बियाने कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

जिल्ह्यातील पांगरदरवाडी येथील शेतकऱ्यांची नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या औरंगाबाद येथील बियाने कंपनीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.भेंडीची लागवड करुन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही भेंडीला फुले व फळे लागत नसल्यामुळे शेतकरी हवालदिक झाले.शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी भेंडी प्लॉट ची स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या ज्योतीराम जाधव व प्रमोद झाडगावकर या दोन कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संध्याकाळ पर्यंत शेतात बसवून ठेवले. दोन दिवसांत कंपनीला अहवाल सादर करुन नुकसान भरपाई देण्याच्या हमीवर रात्री उशिरा कर्मचाऱ्यांची सुटका झाली. तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील 20 शेतकऱ्यांनी बँकेकडून व बचत गटांकडून व्याजाने पैशे घेऊन एप्रिल महिन्यामध्ये औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीच्या नाथ-05 या भेंडीच्या वाणाची लागवड केली.पाण्याची मुबलक व्यवस्था नसतानाही टँकरने पाणी घालुन शेतकऱ्यांनी भेंडीचे पीक जगावले. 55 ते 60 दिवसांत शेतकऱ्यांना भेंडीच्या फळाचे उत्पन्न अपेक्षित असताना तीन महिने उलटूनही पिक आले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व त्या कंपनीवर तात्काळ बंदी घालावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.पांगरदरवाडी येथील 20 शेतकऱ्यांनी 30 एकरांवर भेंडीची लागवड केली होती.प्रति एकरी त्यांना आजपर्यंत 60 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीकडून महेश डोंगरे, लक्ष्मण जाधव, कुमार कदम, सोमनाथ जाधव, आबा गाटे, गोकुळ मते, यांच्या सह इतर शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.Body:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.