उस्मानाबाद - जिल्ह्यातली उष्णतेची लाट कमी होत नाही. जिल्ह्यातला उष्णतेचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्यावरती जात आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज ६ ते ७ रुग्ण उष्माघात उपचारासाठी येतात. त्यामुळे उन्हाळ्यातील उष्णता आर्थिक आणि मानसिक त्रास देणारी ठरत आहे.
जिल्हा रुग्णालयात बालरुग्णांची संख्या कमी असून वृद्ध व समवयस्क लोकांची संख्या जास्त असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांनी सांगितले. या उष्माघाताशी सामना करण्यास जिल्हा रुग्णालयात सक्षम आहे.
याचबरोबर नागरिकांनी या उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वतःचा बचाव करायला हवा. सकाळी अकरा ते साडेचारपर्यंत घराच्या बाहेर पडणे कटाक्षाने टाळावे. कडक उन्हात श्रमाची कामे करू नयेत. सातत्याने पाणी व पांढरे कपडे घालावेत. वेळेवर पाणी प्यावे, तरी अशक्तपणा जाणवत असेल तर तात्काळ रुग्णालयाला भेट द्यावी. असे आवाहन डॉक्टर राज गलांडे यांनी केले आहे.