ETV Bharat / state

कायम स्वरुपाचे मानधन मिळवून देण्याच्या अमिषाने ग्राम रोजगार सेवकांना घातला लाखोंचा गंडा

ग्राम रोजगार सेवकांना शासनाकडून कायम स्वरुपाचे मानधन मिळून देण्याचे अमिष दाखवत, एका व्यक्तीने 4 लाखांचा गंडा घातला.. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांसोबत हा प्रकार घडला आहे..

विनोद चव्हाण
author img

By

Published : Nov 12, 2019, 11:41 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांना शासनाकडून कायम स्वरुपाचे मानधन मिळून देण्याचे अमिष दाखवत, एका व्यक्तीने 4 लाखांचा गंडा घातला आहे. स्वतःला 'महाराष्ट्र राज्यग्राम रोजगार सेवक संघ, औरंगाबाद' येथील संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगत विनोद चव्हाण नावाच्या व्यक्तीने ही फसवूक केल्याचा आरोप सेवकांनी केला आहे. परांडा तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांसोबत हा प्रकार घडला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांना कायम स्वरूपाचे मानधन मिळवून देण्याच्या अमिषाने लाखोंचा गंडा

हेही वाचा... सांभर तलावाभोवती आढळले हजारो पक्षांचे मृतदेह..

रोजगार हमी योजनेचे काम पाहणारे ग्राम रोजगार सेवकांना शासनाकडून कायम स्वरुपी दर महिना मानधन मिळवून देण्यासाठी मंत्रालयातून जीआर काढून देतो, असे या व्यक्तीने खोटे सांगितले. स्वतःला संघटनेचा तथाकथीत अध्यक्ष म्हणावणाऱ्या विनोद चव्हाण याने परंडा तालुक्यातील रोजगार सेवकांची विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रालयातून जीआर निघेल, असे खोटे सांगून पैसे लाटले. सुमारे ४० ग्राम रोजगार सेवकांकडून प्रत्येकी १० हजाराप्रमाणे ४ लाख रुपये त्याने घेतल्याचे सेवकांनी म्हटले आहे.

हेही वाचा...'संयम बाळगा; चिंता करू नका', उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन

ग्रामरोजगार सेवकांनी जीआर निघाला नसल्याने चव्हाण याच्यासोबत फोनवर विचारणा केली असता, पैसे सबंधित विभागाला दिले आहेत. काम होऊन जाईल, अशी बतावणी केली. तसेच या सेवकांची समजूत काढण्यासाठी तो १२ नोव्हेंबरला परांडा येथे भेटीला आला. यावेळी मात्र सेवकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने, त्याला तिथेच थांबवून धरले. तसेच तालुक्यातील सेवकांचे पैसे परत करण्याबाबत मागणी केली, मात्र त्याने सर्व पैसे अधिकारी आणि सबंधित नेत्यांना दिल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आपली फसवणूक झालेल्यांचे सेवकांच्या लक्षात आल्याने, त्यांनी त्याला पकडून ठेवले आहे. तसेच पैसे दिल्याशिवाय त्यास सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा... राष्ट्रपती राजवटीचा सरकार बनवण्यावर कोणताही अडथळा नाही - श्रीहरी अणे

Intro:रोजगार सेवकांना कायम मानधन करून देतो म्हणुन लाखो रुपयांचा गंडा

उस्मानाबाद- रोजगार सेवकांना शासनाकडून कायम मानधन मिळून देण्याची आश्वासन देत थाप मारून महाराष्ट्र राज्यग्राम रोजगार सेवक संघाचे औरंगाबाद जिल्हातील तथाकथीत अध्यक्ष विनोद चव्हाण याने परंडा तालूक्यातील ग्रामरोजगार सेवकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम पाहणारे ग्रामरोजगार सेवक यांना शासनाकडून कायम स्वरुपी दर महिना मानधन मिळून देण्यासाठी मंत्रालयातुन जी.आर. काढून देतो अशी थाप संघटनेचा तथाकथीत अध्यक्ष विनोद चव्हाण याने परंडा तालूक्यातील रोजगार सेवकांना मारली व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्या पुर्वी मंत्रालयातुन जी.आर निघेल अशी थाप मारून ४० रोजगार सेवका कडून प्रत्येकी १० हजार प्रमाणे ४ लाख रुपये घेतले.या संबंधी जी.आर. निघाला नसल्याने ग्रामरोजगार सेवकांनी फोन वर विचारण्या केली असता पैसे सबंधीत विभागाला दिले आहे काम होऊन जाईल अशी बतावणी केली ग्रामरोजगारांची समजुत काढण्यासाठी व दि १२ रोजी परंडा भेटीला आला असता आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तालूक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी चव्हाण यास दिलेले पैसे परत देण्याची मागणी केली मात्र त्याने सर्व पैसे आधीकारी व सबंधीत नेत्यांना दिल्याचे सांगुन पैसे देण्यास नकार दिला.या प्रकरणात फसवणुक झालेल्या सेवकांनी त्याला पकडून ठेवले आहे व पैसे दिल्या शिवाय जाऊ देणार नसल्याची भुमीका घेतली आहे.Body:यात त्यांनीच बनवलेला साऊंड byte आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.