उस्मानाबाद - जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याबरोबरच यावेळी प्रथमच ईव्हीएम मशीन आणि कर्मचाऱ्यांना पोहचवणाऱ्या बसमध्ये जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे.
ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी बस कोणत्या मार्गावरून जात आहे. हे मार्ग चुकत आहे का? बस योग्य मार्गाने जात आहे का? हे पाहण्यासाठी जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. जीपाएस सिस्टीमची कंट्रोल रूम उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. या कार्यालयात १० अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ४६९ बस असणार आहेत. तर २१२७ मतदान केंद्रावर ईव्हीएम व कर्मचाऱ्यांची टीम पोहोचवण्यासाठी या बसाचा वापर करण्यात येणार आहे.