ETV Bharat / state

माझी तब्येत चांगली, संमेलनाला उपस्थित राहणार - अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो

author img

By

Published : Jan 10, 2020, 8:56 AM IST

Updated : Jan 10, 2020, 10:18 AM IST

साहित्य संमेलनाच्या सुरुवातीलाच संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत गुरुवारपासून खालावली असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तब्येत आता बरी आहे. मी तब्येतीबद्दल संतुष्ट आहे आणि मी कार्यक्रमाला संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

father fransis dibrito
अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो

उस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीलाच संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत गुरुवारपासून खालावली असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तब्येत आता बरी आहे. मी तब्येतीबद्दल संतुष्ट आहे आणि मी कार्यक्रमाला संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 'ईटीव्ही' भारतसोबत संवाद साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले, माझी तब्येत आता बरी आहे. डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे. मात्र, मी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तर तीनही दिवस संमेलनाला उपस्थित राहणार का? यावर ते म्हणाले, डॉक्टर जो सल्ला देतील त्याप्रमाणे निर्णय घेणार आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना गुरुवारपासून उदघाटक ना. धो. महानोर यांना काही संघटनांनी धमकीचे फोन केले होते. तसेच संमेलनाचे अध्यक्ष यांचीही तब्येत खालावत असल्याने आता वेगवेगळे तर्क वितर्क लावले होते. मात्र, ते संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर मी सुरक्षेबद्दल कोणतीही मागणी केली नाही. शासन सुरक्षेबद्दल आपली जबाबददारी पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'गोरोबा काका नगरी'मध्ये पार पडणार संमेलन..

उस्मानाबादमधील थोर संत गोरोबा काका यांच्या नावावरून संमेलनाच्या जागेला 'गोरोबा काका नगरी' असे नाव देण्यात आले आहे. याठिकाणी साहित्य रसिकांना पुस्तके खरेदी करता यावीत यासाठी भव्य ग्रंथालयही उभारण्यात आले आहे.

आली साहित्याची वारी.. गोरोबांच्या दारी!

संत गोरोबा यांच्या नावावरूनच यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे 'थीम साँग' हे 'आली साहित्याची वारी.. गोरोबांच्या दारी' असे रचण्यात आले आहे. प्रसिद्ध गीतकार वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहिले आहे. संत गोरोबा काका, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची महती सांगणारे हे गाणं आहे. या गाण्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा जपणारी ढोल, संबळ, खंजिरी आदी पारंपरिक वाद्ये वाजवण्यात आली आहेत. हृषीकेश यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

हेही वाचा - साहित्य संमेलन आजपासून; अध्यक्ष फादर दिब्रिटो यांची प्रकृती बिघडली, उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Intro:फादर फ्रान्सिस दिब्रिटो वन-टू-वन

त्यांना व्याकरण भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीलाच याचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत कालपासून खालावली असल्याचे सांगितले जात होते व डॉक्टरांनी विश्रांतीची गरज असल्याचेही सांगितले मात्र आज दिवसभर या कार्यक्रमाला फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे हजर राहणार असल्याचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ईटीव्ही भारत बोलताना सांगितले आहे

Body:यात वन-टू-वन आहे

Conclusion:कैलास चौधरी
Last Updated : Jan 10, 2020, 10:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.