मुंबई राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन Monsoon Session of State Legislature दरम्यान उस्मानाबाद येथील शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न Osmanabad farmer attempted self immolation केला. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवली. मात्र, शेतकरी भाजला farmer burned in self immolation असून पालिका रुग्णालयात उपचार्थ दाखल केले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Osmanabad farmer attempt self immolation in mumbai
अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून लावली आग राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना आज उस्मानाबाद येथील सुभाष देशमुख या ४५ वर्षीय शेतकऱ्याने विधान भवन समोरील आयनॉक्स समोर स्वतःला पेटवून घेतात आत्मदहनाचा प्रयत्न केला. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल केले आहे.
प्रशासकीय दरबारात जमिनीचा वाद सूटेना सुभाष भानुदास देशमुख यांचा जमिनीचा वाद सुरू होता. सातत्याने राज्य सरकारकडे ते पाठपुरावा करत होते. मात्र अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे राज्य सरकार प्रशासकीय यंत्रणांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आज विधानभवनाच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.