ETV Bharat / state

कॅमेऱ्यात येण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांची धडपड; मुख्यमंत्र्यांनी दिली समज

कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी व आमदार-खासदार तसेच इतर कर्मचारी एकमेकांना चिटकून बसले होते. ऐरवी सर्वसामान्य लोकांना सोशल डिस्टंसिंग नावाने दंड आकारण्यात येतो. मात्र, या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांनीच गर्दी करत सोशल डिस्टन्सचा नियम फाट्यावर मारला.

कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन
कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन
author img

By

Published : Jul 23, 2020, 6:19 PM IST

उस्मानाबाद - भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या परवानगीनंतर उस्मानाबादमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सला हरताळ फासणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी झापले, तर असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी समज दिली.

कोरोना टेस्टिंग लॅबचा उद्घाटन कार्यक्रम

उस्मानाबदमध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ऑनलाइन पद्धतीनेच आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री शंकर गडाख यांची देखील हजेरी होती. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी, खासदार आणि आमदारांची उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी सर्वांनाच विनंती केली आणि सोशल डिस्टन्स ठेवण्यास सांगितले. ऑनलाइन उद्घाटन असल्यामुळे कॅमेरा लावण्यात आला होता. या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी व आमदार - खासदार तसेच इतर कर्मचारी एकमेकांना चिटकून बसले होते. ऐरवी सर्वसामान्य लोकांना सोशल डिस्टंसिंग नावाने दंड आकारण्यात येतो. मात्र, या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांनीच गर्दी करत सोशल डिस्टन्सचा नियम फाट्यावर मारला. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनी फटकारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा - जिमसह शॉपिंग मॉल सुरू करण्याचा सरकारचा विचार; लोकल रेल्वेचा निर्णय मुख्यमंत्री घेतील- आरोग्य मंत्री राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.