ETV Bharat / state

नाशिकच्या 'या' ठिकाणी आहे भारतातील सर्वप्रथम स्थापन झालेले बाळ येशूचे मंदिर

नाशिकरोड येथे भारतातील सर्वप्रथम उभारण्यात आलेले येशूचे मंदिर आहे. 1970 साली हे मंदिर उभारण्यात आले. नाताळच्या निमित्ताने याठिकाणी विद्यूत रोषणाई करण्यात आलेली आहे. देशभरातून अनेक भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

yeshu-temple-in-nashik
बाळ येशूचं मंदिर
author img

By

Published : Dec 25, 2019, 2:20 AM IST

Updated : Dec 25, 2019, 11:08 AM IST

नाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड येथे 1970 साली भारतातील सर्वप्रथम बाळ येशूचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिरात ख्रिसमस सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या 'बाळ येशू'च्या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. भक्तांकडून बाळ येशूला मोठ्या आस्थेने खेळणी अर्पण केल्या जाते. खेळणी अर्पण केल्याने केलेला नवस पूर्ण होतो आणि दुःखातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे नोकरी, विवाह, संतती आदी समस्यांचा नवस करण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. शिवाय आपल्या समस्या फादर सामोर व्यक्त करून त्यांच्याकडून मार्गदर्शन देखील घेत असतात.

भारतातील सर्वप्रथम स्थापन झालेलं बाळ येशूचं मंदिर

नाताळ निमित्त या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात बाळ येशूच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला आहे. येशूच्या जन्मदिनी बाळ येशूची गीत सादर केल्या जातात. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर, आई बबिता कपूर यांनी या मंदिरात येऊन येशूंचे दर्शन घेतले आहे.

Intro:माहित आहे का ? भारत सर्वप्रथम स्थापन झालेलं बाळ येशूचं हे मंदिर..

Body:नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड इथं 1970 साली भारतातील सर्वप्रथम बाळ येशूचं मंदिर उभारण्यात आलं..ह्या मंदिरात ख्रिसमस सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो,त्याच बरोबर फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या बाळ येशूच्या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात....

या मंदिरात असलेल्या बाळ येशूला खेळणी अर्पण केल्यानंतर केलेला नवस पूर्ण होतो आणि दुःखातून मुक्ती मिळते अशी भाविकांची मान्यता आहे..नोकरी,विवाह, संतती आदी समस्या साठी भाविक देशभरातून येऊन नवस करत असतात...तसेच मनातील समस्या,चुका फादर सामोरे व्यक्त करून त्याच्या कडून मार्गदर्शन घेत असतात...

नाताळ निमित्त ह्या मंदिराला आकर्षक विदूत रोषणाई करण्यात आली असून मंदिर परिसरात बाळ येशूच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला आहे..तसेच ह्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, कलाकार बाळ येशूची गीत सादर करत हा दिवस येशूचा जन्म दिवस म्हणून साजरा करता,भाविक देखील येशूचा आशीर्वाद गर्दी करता,

ह्या बाळ येशूचा मंदिरावर कपूर कुटुंबाची देखील मोठी श्रद्धा आहे..प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर, तिची बहीण करिश्मा कपूर आई बबिता कपूर यांनी ह्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं होतं..सर्वसामान्य भाविकांन सोबतच सेलिब्रेटीनची देखील ह्या मंदिरावर श्रद्धा आहे...
बाईट ट्रेव्हर मिरांडा -फादर

Conclusion:
Last Updated : Dec 25, 2019, 11:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.