ETV Bharat / state

Women Protest Against Water Scarcity : नाशिकमध्ये महिलांचा रस्ता रोको; म्हणाल्या, कामावर जाण्याऐवजी पाण्यासाठी करावी लागते वणवण - नाशिक पाणीटंचाईवर जिल्हाधिकारी

आमचे गाव नाशिक शहराच्या परिसरात असूनही गेल्या ५० वर्षांपासून आमच्याकडे पाण्याची सोय नाही. येथील महिला दररोज पाणी आणण्यासाठी पायी चालत येतात. आपल्यापैकी बहुतेक मजूर आहेत, तरीही आपल्याला कामावर जाण्याऐवजी पाण्यासाठी वणवण करावी लागते, याविरोधात नाशिकमध्ये महिलांनी हंडा मोर्चा काढला आहे. ( water scarcity against Women protest in nashik )

Women Protest Against Water Scarcity
नाशिकमध्ये महिलांचा रस्ता रोको
author img

By

Published : May 28, 2022, 5:33 PM IST

Updated : May 28, 2022, 6:05 PM IST

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील तिरडशेत गावातील महिलांनी तीव्र पाणीटंचाई विरोधात संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला. आमचे गाव नाशिक शहराच्या परिसरात असूनही गेल्या ५० वर्षांपासून आमच्याकडे पाण्याची सोय नाही. येथील महिला दररोज पाणी आणण्यासाठी पायी चालत येतात. आपल्यापैकी बहुतेक मजूर आहेत, तरीही आपल्याला कामावर जाण्याऐवजी पाण्यासाठी वणवण करावी लागते, याविरोधात नाशिकमध्ये महिलांनी हंडा मोर्चा काढला आहे. ( water scarcity against Women protest in nashik )

महिलांचा रस्ता रोको व प्रतिक्रिया

जलजीवन अभियानांतर्गत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील गावांचे आम्ही चिन्हांकित करत आहोत. पाणीपुरवठ्याशी संबंधित काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. आम्ही गावकऱ्यांसाठी तात्पुरती व्यवस्था केली आहे, असे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी सांगितले आहे.

पाण्यासाठी भटकंती - नाशिक जिल्ह्यात जवळपास छोटीमोठी 24 धरणे आहेत. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूर मधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता तरी देखील काही तालुक्यात भीषण उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. अक्षरशः महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागत आहे.

प्रशासनाने मदत करण्याचे आवाहन - जिह्यात गेल्या काही दिवसापासून विहिरींनी तळ गाठला असल्याने अक्षरशा नागरिकांना फक्त पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याकरता गावात हातपंपावर फक्त हंडाभर पाणी मिळत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करावे अशी मागणी जोर धरू लागली. मात्र गावे ही वस्तीवर राहत असल्याने टॅंकरही खूप महाग पाणी पुरवठा करत आहेत. याकडे मात्र प्रशासन सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहे.

हेही वाचा - Nashik Water Crisis : गावात पाण्याची तीव्र टंचाई, मुलांना लग्नासाठी देत नाहीत मुली, पाहा खास रिपोर्ट

Last Updated : May 28, 2022, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.