ETV Bharat / state

Water issue in Nashik : हंडाभर पाण्याकरिता महिलांचा जीव धोक्यात; 50 फूट खोल विहिरीतून उतरून काढावे लागते पाणी - Water issue in Nashik

यंदाच्या कडक उन्हाळ्यात नाशिकच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाईचा प्रश्न नाशिक ग्रामीण भागाततील नागरिकांसमोर ( problem of severe water scarcity ) उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात ही समस्या समोर ठाकली आहे. त्र्यंबकेश्वरच्या मेटघर गाव येथे हंडाभर पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट आणि जीवघेणी कसरत ( water issue in Trimbakeshwar's Metghar village ) करावी लागत आहे. जीव धोक्यात घालून पाण्यासाठी येथील महिलाना (women goes to water well ) थेट खोल विहिरीत उतरावे लागत आहे.

महिलेची पाण्यासाठी वणवण
महिलेची पाण्यासाठी वणवण
author img

By

Published : Apr 4, 2022, 4:36 PM IST

Updated : Apr 4, 2022, 4:52 PM IST

नाशिक - धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ल्यावरील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. हंडाभर पाण्यासाठी महिलांना थेट खोल विहीरीत उतरावे लागते.

यंदाच्या कडक उन्हाळ्यात नाशिकच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाईचा प्रश्न नाशिक ग्रामीण भागाततील नागरिकांसमोर ( problem of severe water scarcity ) उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात ही समस्या समोर ठाकली आहे. त्र्यंबकेश्वरच्या मेटघर गाव येथे हंडाभर पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट आणि जीवघेणी कसरत ( water issue in Trimbakeshwars Metghar village ) करावी लागत आहे. जीव धोक्यात घालून पाण्यासाठी येथील महिलांना ( women goes to water well ) थेट खोल विहिरीत उतरावे लागत आहे.

50 फूट खोल विहिरीतून उतरून काढावे लागते पाणी

उन्हाळा सुरू होताच भीषण पाणी टंचाईची समस्या - हे दृश्य पाहून आपल्याला देखीक अंगावर काटा येईल, अशी ही भयाण परिस्थितीला येथील महिलांना सामोरे जावे लागत आहे. विहिरीत उतरत असताना पाय जर घसरला तर जीव जाण्याचीदेखील शक्यता या ठिकाणी आहे. सुमारे ५०० लोकवस्ती असलेल्या या गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. उन्हाळा सुरू होताच आदिवासी भागात भीषण पाणी टंचाईची समस्या उभी राहते.

आम्हाला पाणी नाही तर साधे ढुंकूनही नेते पाहत नाहीत- निवडून दिलेल्या नेत्यांसमोर आता फक्त लोटांगण घालणे बाकी आहे. निवडणुकीच्या वेळी आम्हाला राम राम केला. पण आता आम्हाला पाणी नाही, तर साधे ढुंकूनही पाहत नाही, असे येथील लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी स्वतः संघर्ष करावा लागत आहे. आता काय सांगू बाबा तुला, आमचे जगणे आम्हाला माहीत अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिली आहे.

हेही वाचा-Criticism Of Fadnavis : ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची कमी बेवड्यांची जास्त काळजी - फडणवीस

हेही वाचा-Pune Parents Beaten at School : पुण्यातील शाळेत पालकांना बाउन्सरकडून पुन्हा धक्काबुक्की, शिक्षणमंत्री कारवाई करणार?

Anil Deshmukh At Hospital : माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे जे रुग्णालयात दाखल

Last Updated : Apr 4, 2022, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.