ETV Bharat / state

विठ्ठल सगळं करणार असेल, तर मुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे - विनायक मेटे

author img

By

Published : Jul 1, 2020, 3:57 PM IST

हे महाविकासआघाडी सरकार निराशावादी आहे म्हणून त्यांनी प्रयत्न न करता सगळे देवावर सोडले. विठ्ठल सगळं करणार असेल, तर तर तुमची गरज काय? असा प्रश्न निर्माण होतो. सगळ विठ्ठलावर सोडणाऱया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारमधून पाय उतार व्हावे, अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली.

Vinayak Mete
विनायक मेटे

नाशिक - विठ्ठल सगळं करणार असेल, तर तर तुमची गरज काय? असा प्रश्न निर्माण होतो. सगळ विठ्ठलावर सोडणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारमधून पाय उतार व्हावे, अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. शासकीय विश्रामगृहा घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तर मुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे

हे महाविकासआघाडी सरकार निराशावादी आहे म्हणून त्यांनी प्रयत्न न करता सगळे देवावर सोडले. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही. करोनाची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातील मराठा समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मराठा आंदोलनातील नागरिकांवरील गुन्हे अद्याप मागे घेण्यात आले नाही. कोपर्डीच्या बहिणीला अजून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा मेटे यांनी दिला.

समाज प्रबोधन करणाऱ्या इंदुरिकर महाराजांना टार्गेट केले जात आहे. वीज बिलाच्या नावाखाली गरिबांना लुटल जात आहे. सातत्याने होत असलेली पेट्रोल व डिझेलची दरवाढ चुकीची असून त्यात राज्याने किती टॅक्स वाढवला याचा शोध घ्यावा लागेल, असे मेटे म्हणाले.

कृषी मंत्र्यांनी शेतकर्‍याचा मुलगा म्हणून काम करावे -
राज्याचे कृषी खाते म्हणजे 'आंधळ दळतंय व कुत्र पीठ खातयं', अशी अवस्था आहे. दादा भुसे यांनी खताच्या दुकानात जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. मात्र, इतके दिवस ते झोपले होते का? असा सवाल मेटे यांनी उपस्थित केला. कृषी मंत्र्यांनी नौटंकी करण्यापेक्षा शेतकर्‍याचा मुलगा असल्याचे कामातून सिध्द करावे, असे आवाहन मेटे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.