ETV Bharat / state

नाशिक : बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे व्हेंटिलेटर पडले बंद, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही - बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे व्हेंटिलेटर पडले बंद

नवीन बिटको कोविड सेंटरमध्ये प्रथम 11 नंबरच्या बेडच्या व्हेंटिलेटरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने व्हेंटिलेटर जळाल्याची घटना घडली. यामध्ये चार व्हेंटिलेटर अचानक बंद पडले. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन येथील रुग्णांना इतरत्र हलवले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली आहे.

बीटको रुग्णालय
बीटको रुग्णालय
author img

By

Published : May 19, 2021, 5:04 AM IST

Updated : May 19, 2021, 5:26 AM IST

नाशिक - नाशिक रोड येथील बिटको कोविड सेंटरमध्ये अचानक संध्याकाळी व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले आहे. येथील रुग्णांवर योग्य उपचार चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. नवीन बिटको कोविड सेंटरमध्ये प्रथम 11 नंबरच्या बेडच्या व्हेंटिलेटरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने व्हेंटिलेटर जळाल्याची घटना घडली. यामध्ये चार व्हेंटिलेटर अचानक बंद पडले. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन येथील रुग्णांना इतरत्र हलवले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली आहे.

बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किट
या विभागात घडला प्रकार

नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयामधील आय.सी.यु. कक्षात सोळा व्हेंटिलेटर असून त्यापैकी एका व्हेंटिलेटरला शॉर्टसर्किट झाल्याने त्यातून धूर निघाला. त्यामुळे तेथील एकूण 4 व्हेंटिलेटर बंद पडले. हे लक्षात आल्यावर त्वरित याच कक्षातील रुग्ण सेवक व डॉक्टरांनी व्हेंटिलेटर असणार्‍या रूग्णांना ऑक्सिजनवर घेऊन स्टँबीलाइझ केले. शॉर्टसर्किट झालेले व्हेंटिलेटर व इतर तीन व्हेंटिलेटर एक एक करत सुरू केले असून त्यावरील रुग्ण स्थिर असल्याची माहिती मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

Last Updated : May 19, 2021, 5:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.