ETV Bharat / state

दिंडोरीचा रस्ता बनला घसरगुंडी, दिवसभरात झाले सहा अपघात - दिंडोरी रस्ता अपघात बातमी

नाशिक-कळवण रस्त्याचे नूतनीकरण होऊन तीन वर्षे उलटले. तरी अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम सुरू असताना अनेक अपघात झाले होते. तर आता ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.

vehicles slips on nashik kalvan road near dindori
दिंडोरीचा रस्ता बनला घसरगुंडी
author img

By

Published : Jun 6, 2021, 7:44 AM IST

दिंडोरी (नाशिक) - नाशिक-कळवण रस्त्याचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने पाऊस होताच या रस्त्यावर वाहनांची घसरगुंडी सुरू होत आहे. वाहनांच्या नुकसानीसोबत अनेक जण जखमी होत आहेत. रणतळ परिसरात शनिवारी तब्बल सहा वाहने घसरून अपघात होत वाहनांचे नुकसान होत प्रवासी जखमी झाले आहे.

नाशिक-कळवण रस्त्याचे नूतनीकरण होऊन तीन वर्षे उलटले. तरी अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम सुरू असताना अनेक अपघात झाले होते. तर आता ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. अक्रळे फाटा ते दिंडोरी व सिडफार्म ते अवनखेड परिसरात पाऊस होताच रस्त्यावर वाहनांची घसरल्याचा प्रकार समोर आले आहेत.

हेही वाचा - Nashik Unlock : पहिल्या टप्प्यात नाही तर तिसऱ्या टप्प्यात, पॉझिटिव्हिटी रेट ७.७५ टक्के

नागरिकांची मागणी -

रणतळे येथील उतार अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. पाऊस होताच येथे गाड्या घसरत आहेत. मागील महिनाभरात दोन ट्रक घसरून त्याखाली दोन चालक दबले गेले होते. त्यांना वाचविण्यात पोलिसांना यश आले होते. रस्त्याचे कामाचा योग्य दर्जा न राखल्याने सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने त्वरित पाहणी करत योग्य ती दुरुस्ती करावी अशी मागणी जयवंत जाधव, नितीन देशमुख, रणजित देशमुख, किरण जाधव आदींनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.