नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे महानगरपालिकेच्या रुग्णालयात लसीकरणासाठी नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर आधी नागरीकांची कोरोना चाचणी केली जात असून नंतरच लसीकरण केले जात आहे.
आधी कोरोना चाचणी, नंतरच लसीकरण -
नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्ण वाढीत नाशिक देशात अव्वल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून रोज हजारोच्या पटीने मिळून येत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सर्व बेड फुल झाली आहेत. अशात आता प्रशासनाने कोरोना लसीकरणावर भर दिला असून सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 45 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात लसीकरण सुरू असून लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आधी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जर व्यक्ती निगेटीव्ह असेल तरच त्याचे लसीकरण करण्यात येत आहे.
खासगी हॉस्पिटलमध्ये अल्प प्रतिसाद -
कोरोना लसीकरणाला महानगरपालिकेच्या रुग्णालयात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दुसरीकडे खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरणाला नागरीकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी नागरीकांना 250 रुपये मोजावे लागत असल्याने नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळते चित्र आहे.
अशी आहे लसीकरणाची आकडेवारी -
- पहिला डोस
आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात 1लाख 13 हजार 707 आरोग्य व इतर कर्मचारी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच 45 ते 60 वयोगटातील एकूण 1 लाख 75 हजार 304 लाभार्थ्यंनी लस घेतली आहे. तर 60 वर्षा वरील लस घेणाऱ्यांची संख्या 18 लाख 89 हजार 771 एवढी आहे.
- दुसरा डोस
आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात 41 हजार 387 आरोग्य व इतर कर्मचारी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच 45 ते 60 वयोगटातील एकूण 7 हजार 744 लाभार्थ्यंनी लस घेतली आहे. तर 60 वर्षा वरील लस घेणाऱ्यांची संख्या 11 हजार 899 एवढी आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 5 लाख 39 हजार 743 डोस देण्यात आले आहेत.
हेही वाचा - IPL २०२१ : 'बॉल सूखा है घूमेगा', चाणाक्ष धोनीची कमाल आणि राजस्थान पराभव