ETV Bharat / state

नाशिकच्या अंबड भागात समाजकंटकांनी केली गाड्यांची तोडफोड; घटना सीसीटिव्हीत कैद

सध्या नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. घरफोडी, दुकानांची लूट, बँक दरोडा, हत्या, वाहनांची तोडफोड अशा घटनांनी नाशिक शहर हादरून गेले आहे. अशातच शहरातील अंबड परिसरात गाड्यांची तोडफोड करत समाजकंटकांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

author img

By

Published : Jun 18, 2019, 7:57 PM IST

नाशिकच्या अंबड भागात समाजकंटकांनी केली गाड्यांची तोडफोड

नाशिक - शहरातील अंबड परिसरात गाड्यांची तोडफोड करत समाजकंटकांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. घरफोडी, दुकानांची लूट, बँक दरोडा, हत्या, वाहनांची तोडफोड अशा घटनांनी नाशिक शहर हादरून गेले आहे.

शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांची प्रतिक्रिया

यातच काल मध्यरात्री पुन्हा एकदा अंबड पोलीस ठाणे हद्दीत अंबड लिंक रोडवरच्या भागात समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. कृष्णनगर, तुळजाभवानी मंदिर परिसरात दोन अज्ञात समाजकंटकांनी महागड्या गाड्यांची तोडफोड करत वाहनांचे मोठे नुकसान केले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून यातील दोन संशयित सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचे भय कमी झाले की, काय असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. लवकरात लवकर या आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Intro:नाशिकच्या अंबड भागात दहशत पसरवण्यासाठी समाजकंटकांनी केली गाड्यांची तोडफोड...

Body:नाशिकच्या अंबड परिसरात गाड्यांची तोडफोड करत समाजकंटकांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे..ह्या बाबत अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..नाशिकमध्ये वाढत्या गुन्ह्या मुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे..

सध्या नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढलं आहे.घरफोडी, दुकानांची लूट ,बँक दरोडा व हत्या ,वाहनांची तोडफोड अशा घटनांनी नाशिक शहर हादरून गेलेय,
यातच काल मध्यरात्री पुन्हा एकदा अंबड पोलीस ठाणे हद्दीत अंबड लिंक रोड वरच्या भागात समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला, कृष्णनगर ,तुळजाभवानी मंदिर परिसरात दोघा अज्ञात समाजकंटकांनी महागड्या गाड्यांची तोडफोड करत वाहनांचे मोठे नुकसान केले,या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून यातील दोन संशयित सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेले, गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचे भय कमी झालंय की काय असा सवाल आता यानिमित्तानं उपस्थित होतोय,लवकरात लवकर या आरोपींचा शोध घेऊन त्यांना शासन करावं अशी मागणी नागरिकांक करतायेत..
बाईट
दिलीप दातीर नगरसेवक शिवसेना
nsk todfod viu 1
nsk todfod viu 1
nsk todfod viu 1
nsk todfod byte

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.