नाशिक - भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेच्या तंबूत येत असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत हे गुरुवारी (दि. 7 जाने.) नाशिक दौऱ्यावर येत असल्याने नाशिकच्या राजकारणात नवा भूकंप होण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब सानप यांच्या पक्ष बदलाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेची रणनीती
शिवसेनेतील बाळासाहेब सानप यांनी पुन्हा काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी केल्याने तोच बदला घेण्यासाठी शिवसेना रणनीती आखत असल्याचे समजत आहे. मात्र, हे दोन बडे नेते कोण याबद्दल अजूनही शिवसेनेकडून कोणतीही माहिती समोर आलेले नाही. मात्र, संजय राऊत यांच्या दौऱ्यात नक्कीच काहीतरी होणार हे निश्चित आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष सध्या महापालिका निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
भाजपाचे दोन बडे नेते शिवसेनेत येणार...?
काही दिवसापूर्वी भाजपचे वसंत गीते यांनी सर्वपक्षीय मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. त्यातही गीते यांच्या पक्ष बदलीच्या चर्चेने जोर धरला होता. त्यामुळे आता वसंत गीते हे भाजपला सोडचिठ्ठी देणार नाहीत ना हे सांगनेही सध्या कठीण आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या दौऱ्यात कोणते दोन नेते शिवसेनेच्या गळाला लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - मध्यरात्री गर्भवतीचा वाहनासाठी आक्रोश; 'खाकी' आली मदतीला धावून
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात 10 महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली