नाशिक - ट्रक आणि तवेरा कारचा झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर उमराने गावाजवळ झाला.
काय आहे घटना?
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या दिशेने जात असलेली तवेरा कार क्र. एमएच 15 सीएम 7712 हिने ट्रक क्रमांक एम एच 43 इ 1806 ला पाठीमागुन जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तवेरामधील तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारच्या एकच्या सुमारास उमराणे गावाजवळ ही घटना घडली. मृतांचे मालेगांव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर जखमींना मालेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या नवीन विषाणुवरही हीच लस उपयोगी ठरेल -आरोग्यमंत्री
याप्रकरणी, देवळा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात इतका भीषण झाला, त्यात कारचा चक्काचूर झाला आहे.