नाशिक- शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 15 मार्चपर्यत बंद ठेवण्यात आलेल्या शाळा पुन्हा पुढे 15 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे. मात्र, 10वी, 12वी चे वर्ग पालकांच्या संमतीने ऐच्छिक सुरू राहणार आल्याचेही जाधव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शाळेची घंटा वाजणारच नाही! आता 31 मार्चपर्यंत बंद राहणार शाळा नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोज एक हजाराच्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. परिणाणी प्रशासनाने नवीव निर्बंध लागू केले आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या शाळा पुन्हा पुढे 15 दिवस म्हणजे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे. मात्र, 10वी, 12वीचे वर्ग पालकांच्या संमतीने ऐच्छिक सुरू राहणार आल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
होम आयसोलेशनमधील बाहेर फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई शहरात होम आयसोलेशनमधील बाहेर फिरणाऱ्या रुग्णांचा शोध घेत त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर अशा बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवर गुन्हाही दाखल होणार आहे. तसेच पुढील 15 दिवसात पालिकेची बिटको रुग्णालयात सॅम्पल टेस्टिंग लॅब सुरू करणार असून त्याअंतर्गत दररोज 2 हजार सॅम्पल तपासणी होणार आहे. नोडल अधिकाऱ्यांकडून खाजगी लॅबकडून दिल्या जाणाऱ्या रिपोर्ट्सची ही तपासणी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
गर्दी दिसल्यास कारवाई100 टक्के लॉकडाऊनची मागणी अधिकाऱ्यांनी बैठकीत केल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. मात्र, आढावा घेतल्यानंतरच निर्णय होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी दुकानांवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. ह्यासाठी पालिका कर्मचारीही रस्त्यावर ऍक्शन मोडमध्ये असून नागरीकांनी वैयक्तिक आणि सामाजिक जाणीव ठेवणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारातील गर्दी दिसली तर कारवाई महानगरपालिका नागरिकांवर कारवाई करणार असून पोलिसांना सुद्धा रस्त्यावर उतरून कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
शहरात 533 प्रतिबंधित क्षेत्रनाशिक शहरातील सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 3284 बर्ड असून सद्य स्थितीत 327 रुग्ण उपचार घेत आहेत. ICU आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध असून शहरात 533 प्रतिबंधक क्षेत्र आहेत. नाशिक शहरासाठी कोरोनाच्या व्हॅक्सीनचा 5 हजार डोसचा साठा आज प्राप्त होणार असून सरकारकडे 50 हजार डोसची मागणी केल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.