ETV Bharat / state

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन साक्षीदारांची आत्महत्या, एनआयएची कोर्टात माहिती - राष्ट्रीय तपास संस्थेने

मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणातील (Malegaon Blast Case) आरोपी माजी कर्नल प्रसाद पुरोहित (Colonel Prasad Purohit) आणि अभिनव भारत लिंकबद्दल तपास यंत्रणेला साक्ष देणाऱ्या साक्षीदारांनी आत्महत्या केली आहे.

Malegaon Blast Case
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
author img

By

Published : Oct 31, 2022, 10:55 PM IST

मुंबई: मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणातील (Malegaon Blast Case) आरोपी माजी कर्नल प्रसाद पुरोहित (Colonel Prasad Purohit) आणि अभिनव भारत लिंकबद्दल तपास यंत्रणेला साक्ष देणाऱ्या साक्षीदारांनी आत्महत्या केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (national investigation agency) सोमवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात (NIA court) सुनावणी दरम्यान ही माहिती दिली.

नैसर्गिक कारणाने आत्महत्या: राष्ट्रीय तपास संस्थेने सोमवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात सांगितले की सप्टेंबर 2008 मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील दोन साक्षीदारांचा मृत्यू झाला आहे. विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी विशेष एनआयए न्यायालयाला सांगितले की दोघांनीही नैसर्गिक कारणाने आत्महत्या केली आहे यासंदर्भातील त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र सादर केले आहे.

आतापर्यंत 27 साक्षीदार उलटले: महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाला यापूर्वीच्या तपास संस्थेला दिलेल्या जबाबात एका साक्षीदाराने दावा केला होता की, आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित आणि या प्रकरणातील इतर आरोपींना आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि इंद्रेश कुमार हे अनेक वेळा भेटले होते. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह आणि पुरोहित आरोपी असलेल्या या खटल्यात आतापर्यंत 27 साक्षीदार उलटले आहेत. दररोज चालणाऱ्या या खटल्यात सुमारे 110 साक्षीदार तपासणे बाकी आहे.

काय आहे प्रकरण? : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर हा बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सुपूर्त करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर ह्या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.