नाशिक- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यांच्या मदतीला अनेक सामजिक संस्था आणि विद्यार्थी देखील पुढे आले आहेत. भाजीपाला, फळे घेण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी एमव्हीपी शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कृषी बास्केट अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे नाशिककरांना मोबाइलच्या एका क्लिकवर ताजा भाजीपाला उपलब्ध होणार आहे.
कृषी बास्केट अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या आवडीचा भाजीपाला वाजवी दरात घरपोच मिळणार आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देखील मदत होत आहे. या कृषी अॅपमध्ये ग्राहकांना ६० प्रकारचा भाजीपाला आणि फळभाज्या मिळणार आहेत. ऑर्डर दिल्यानंतर २४ तासाच्या आता ग्राहकांना हा भाजीपाला उपलब्ध होणार आहे. अॅप सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांनी या अॅपला मोठा प्रतिसाद दिल्याची माहिती एमव्हीपी शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांनी दिली.
हेही वाचा- रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वाहनातून परप्रांतीयांचा प्रवास... इगतपुरी रेल्वे स्थानकात तणाव