ETV Bharat / state

Shivshahi Bus Fire : नागपूरनंतर आता नाशिकमध्ये शिवशाही बसला आग; टायर फुटल्याने घेतला पेट, जीवितहानी नाही

नाशिकच्या मुंबई नाका येथील महामार्ग बस स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटल्याने आग लागली. यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. मात्र बस जळुन खाख झाली आहे. बस स्थानकावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणली आहे.

Shivshahi Bus Fire
Shivshahi Bus Fire
author img

By

Published : Apr 4, 2023, 10:20 PM IST

नाशिक : महामार्ग बस स्थानकावर उभी असलेली शिवशाही बसचे अचानक टायर फुटल्याने आग लागल्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शिवशाही बसमधील होणाऱ्या वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रवाशांची एकच धावपळ : नाशिकच्या बस डेपो मधून 4 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता मुंबई नाका येथील महामार्गावर बोरवलीला जाण्यासाठी बस आली. बसमध्ये प्रवासी चढण्याअगोदरच काही वेळातच बसच्या मागील बाजूचे टायर फुटले. त्यामुळे जोरदार आवाज झाला. काही क्षणातच टायरने पेट घेत बसला आगच्या विळख्यात घेतले. त्यामुळे महामार्गावर असलेल्या प्रवाशांची एकच धावपळ उडाली. मात्र, बस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत अग्निरोधक उपकरणाच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग मोठ्या प्रमाणात असल्याने तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळात आग आटोक्यात आणली.

नागपूरहून निघालेल्या शिवशाही बसला आग : नागपूर अमरावती महामार्गावर नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या शिवशाही बसला आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. बस कोंढाळीजवळील साई मंदिराजवळ आली असताना अचानक बसमधून धूर बसने पेट घेतला. मात्र, चालकाच्या पुढाकारामुळे गाडीतील प्रवासी बचावले.

नेमके काय घडले? नागपूरहून अमरावतीकडे जाणारी शिवशाही बस (MH-06, BW-0788) सकाळी नागपूरहून निघाली. कार कोंढाळीजवळील साई मंदिराजवळ आली असता इंजिनमधून धूर येत असल्याचे चालक अब्दुल जहीर शेख यांना दिसले. त्यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली. यावेळी बसमधील वाहक उज्वल देशपांडे यांनी प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यावेळी गाडीतील 16 प्रवासी वेळीच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, प्रवासी गाडी खाली उतरताच आगीने उग्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे खाक झाली होती. यानंतर एसटी महामंडळाच्या दुसऱ्या बसने प्रवाशांना पुढे पाठवण्यात आले.

मागील वर्षी घडलेल्या दुर्घटना, पहिली घटना : यवतमाळ होऊन मुंबईच्या दिशेने निघालेली चिंतामण ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान आग लागली होती. नाशिकच्या संभाजीनगर रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर आल्यानंतर सर्व्हिस रोडवरून गुजरात दिशेने सिन्नरकडे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली होती. बसची धडक ट्रकच्या डिझेल टाकीला लागल्याने काही वेळातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली होती. यात बसमधील 48 प्रवाशांपैकी 12 प्रवाशांचा जळून जागीच मृत्यू झाला होता. तर, 36 जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले होते.

दुसरी घटना : ग्रामपंचायत टोल बुथजवळील श्री सप्तशृंग गड येथे दुपारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. पिंपळगाव बसवंत आगारातील एसटी बस, चालक, वाहकाने सर्व ३३ प्रवाशांना खाली उतरत अनर्थ टळला होता. आपत्ती व्यवस्थापन पथकाचे स्वयंसेवक, ट्रस्ट संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोपवेचे कर्मचारी आदींना तातडीने घटनास्थळी पाचारण करून अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवली होती. सर्वांनी परिस्थितीची जाणीव ठेवून वेळीच योग्य ती उपाययोजना केल्याने मोठी दुर्घटना टळली होती.

तिसरी घटना : मनमाड-मालेगाव महामार्गावर कानडगाव शिवार येथे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यातील सिलिंडरने अचानक पेट घेतला होता. गाडीत ऑक्सिजन सिलेंडर असल्याने स्फोट झाला होता. मनमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेत अग्निशमन दलाला पाचारण केले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाव्हती.

हेही वाचा - Goseva Commission : महाराष्ट्रत गोसेवा आयोगाची स्थापना, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.