नाशिक - दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. रस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने दिली होती. त्यानंतर, प्रशासनाला जाग येवून रात्रीतच रस्त्याच्या कामाला जोरदार सुरवात करण्यात आली आहे. संथगतीने सुरू असलेल्या या कामाला गती मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारत'चे आभार मानले आहेत.
हेही वाचा - वनी-सापुतारा रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त, सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ
वणी-सापुतारा हा राज्य मार्ग होता. परंतू काही महिन्यांपासून या राज्य मार्गाचे राष्ट्रीय मार्गात हस्तांतरीत झाल्यामुळे रस्त्याचे रूंदीकरण सुरू होते. यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले होते. या खोदलेल्या रस्त्यामुळे नाशिककडून सापुतारा मार्गे सुरतला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग पांडाणे, बोरगावमार्गे वळविण्यात आला आहे. या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु असून, आता गेल्या महीन्यापासून पांडाणे गावाजवळही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांना सर्दी ,खोकला, श्वसनाच्या आजाराला सामोर जावे लागत आहे.
हेही वाचा - अर्थसंकल्प: 'शिक्षण धोरणात पैशाची तरतूद फारच कमी; शाळाबाह्य मुलांचा विचार नाही'
पांडाणे रस्त्यालगत प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणीही नवजात बालके असल्यामुळे त्यांना सुध्दा धुळीचा त्रास होत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या विदयार्थ्यांना शाळेत जातांना त्रास होत असतो. तसेच वाहनाच्या चाकातून खडी उडणे याचाही त्रास विद्यार्थ्यांना होतो. रस्तावर सतत पाणी मारुन उडणारी धुळ बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यात पांडाणे गावाजवळ रस्त्याचे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केल्यामुळे प्रत्येक घरात धुळीचे साम्राज झाले होते. त्यामुळे, आपल्या घरावर सेडनेट लावून धुळीमुळे होणाऱ्या आजारापासून सुटका करण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करित आहेत .
तसेच पुणेगाव फाटा ते देव नदी पर्यंतचा रस्ता त्वरीत तयार करून, व खोदकाम केलेल्या रस्त्यावर पाणी मारुन धुळ बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार, 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल घेवून त्वरीत रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.