ETV Bharat / state

'लोकसभेतील पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळत आहेत'

author img

By

Published : Jan 19, 2020, 7:20 PM IST

काही कार्यक्रमांनिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

Ravasaheb Danve
रावसाहेब दानवे

नाशिक - त्यांनी माझे नाव घेऊन आरोप करावेत. मी कोणती जमीन बळकावली हे सिद्ध करुन दाखवावे. लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्याने ते काहीही बरळत आहेत, अशी नाव न घेता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली.

रावसाहेब दानवे, भाजप नेते

हेही वाचा - नाशिकचा पारा @ 7 अंशापर्यंत; गुलाबी थंडीच्या आनंदासाठी सुरेल गाण्यांची मैफील

काही कार्यक्रमांनिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, साईबाबा जन्मस्थळाचा वाद हा जुनाच आहे. मात्र, आता निधी मंजूर झाला आणि त्यातून या घटना घडत आहेत. सरकारने त्वरित हा वाद थांबवावा, अशी मागणी केली. यासोबतच हे सरकार भाजपच्या अनेक प्रकल्पांना ब्रेक लावत आहे. त्यामुळे हे सरकार जास्त काळ न टिकणारे अमर, अकबर आणि अँथनीचे हे सरकार आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा - संतापजनक...अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार

केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा केला आहे. नागरिकत्व हिसकावण्यासाठी केलेला नाही. विरोधक याबाबत गैरसमज पसरवत आहेत. जनतेला लवकरच ते कळेल. उद्या मी काश्मीरला जाणार आहे. तेथील जनतेशी संवाद साधेन. त्यांच्या समस्या समजून घेऊन केंद्र सरकारला कळवेन. सरकारच्या ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत त्या पोहोचविण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याचे निराकरण होईल, असा मला विश्वास आहे, असे दानवे म्हणाले.

Intro:रावसाहेब दानवे यांनी आज दुपारी नाशिकच्या भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला असता पत्रकारांनी त्यांना खोतकरांनी केलेल्या नाराजी आणि टीकेबाबत प्रश्न विचारला असता खोतकर यांनी माझ्यावर कोणतेही आरोप केलेलं नसून त्यांनी त्यांचं वयक्तीक मत मांडलं असावं असं म्हंटलय तर साईबाबा जन्मस्थळाचा वाद हा जुनाच आहे मात्र आता निधी मंजूर झाला आणि त्यातुन या घटना घडत असून शासनाने त्वरित हा वाद थांबवावा अशी मागणी केलीय यासोबतच भाजपच्या अनेक प्रकल्पांना हे सरकार ब्रेक लावत असून हे सरकार म्हणजे जास्त काळ न टिकणारे अमर, अकबर आणि अँथनीचे हे सरकार असल्याचं त्यांनी म्हंटलय.

बाईट - रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्रीBody:शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांनी जमिन बळकावल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत विचारले
असता, ते म्हणाले, मी राजूर संस्थानचा सेक्रेटरी आहे. खैरे यांनी माझं नाव घेऊन आरोप करावेत. कोणती जमीन मी बळकावली हे सिद्ध करुन दाखवावे. लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्याने खैरे काहीही बरळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा प्रश्न उपस्थित करुन जनतेची दिशाभूल करु नये, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला खुर्चीत बसवले, यावर ते म्हणाले, तहसीलदाराला खुर्चीत बसवल्याने कामे
होत नाहीत. आपण आपल्या खुर्चीवर बसून त्यांच्याकडून कामे करुन घ्यायची असतात. त्याच्याकडून काम करुन घ्यायचे असते. हे अद्याप त्यांना उमजलेले नाही.
खासदार दानवे म्हणाले, केंद्र सरकारने सीएए हा नागरिकत्व
देण्यासाठीचा कायदा केला आहे. नागरिकत्व हिसकावण्यासाठी केलेला नाही. विरोधक याबाबद गैरसमज पसरवत आहेत. जनतेला लवकरच ते कळेल. उद्या मी काश्मीरला जाणार आहे. तेथील जनतेशी संवाद साधेन. त्यांच्या समस्या समजून घेऊन केंद्र सरकारला कळवेन. सरकारच्या ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत त्या पोहोचविण्याचे काम आम्ही सुरु केले आहे. त्याचे निराकरण होईल असा मला विश्वास आहे. Conclusion:पाकिस्तानमध्ये 3 टक्के तर बांगलादेशमध्ये 7 टक्के हिंदू आहेत. अफगाणिस्तानसह हे तिन्ही देश मुस्लिम आहेत. तेथील अल्पसंख्यांक हिंदूच्या समस्या समजून
घेतल्या पाहिजेत...असे त्यांनी या वेळी सांगितले..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.