ETV Bharat / state

भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे बळ मिळो; गोदामाईच्या साक्षीनं पंतप्रधान मोदींचा संकल्प

PM Narendra Modi Kalaram Mandir Nashik : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक इथं स्थित पौराणिक रामकुंडावर समृद्ध भारताचा संकल्प केलाय. गोदापूजन आणि संकल्प यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे अर्धातास रामकुंडावर उपस्थित होते. रामकुंड येतील गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या मार्गदर्शनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पूजाविधी आणि संकल्प पुराणोक्त पद्धतीने केले.

Prime Minister Narendra Modi  In Nashik
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 6:18 PM IST

Updated : Jan 12, 2024, 10:29 PM IST

गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक इथं स्थित पौराणिक रामकुंडावर पुजा केली

नाशिक PM Narendra Modi Kalaram Mandir Nashik : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१२ जानेवारी)रोजी नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकशाहीत तरुणांचा सहभाग जास्त. राष्ट्राचे भविष्य तेवढेच चांगले होईल. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत कालखंडाचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या इतिहासात तुमचे नाव नोंदवण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी जे काही केले ते देशासाठी केले. तसंच, लोकशाहीत तरुणांचा सहभाग जितका अधिक असेल तितके देशाचे भवितव्य चांगले असेल असंही मोदी यावेळी म्हणाले.

प्रधान आचार्य तथा गंगा गोदावरी पंचकोटी महासंघ नाशिकचे अध्यक्ष सतीश शुक्ल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संकल्प सांगतानाचा व्हिडिओ

अन्नच्या रुपाने नवी ओळख दिली : या कालखंडात देशातील अशी युवापिढी तयार होत आहे जी गुलामीच्या दबावात आणि प्रभावापासून मुक्त आहे. अमृतकाळच्या आजच्या तरुण पिढीवर माझा खूप विश्वास आहे. भारताची युवा पिढी आयुर्वेदाचे ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे. तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना विचारा. ते सांगतील, त्यांच्या काळात जेवणात बाजरीची भाकरी, कुटकी, रागी, ज्वारी असायची. पण गुलामीच्या मानसिकतेत या अन्नाला गरिबीसह जोडलं गेलं. यांना स्वयंपाकघरातून बाहेर काढलं गेलं. हेच अन्न आता मिलेट्सच्या रुपात, सुपर फूडच्या रुपात पुन्हा स्वयंपाकघरात पोहोचत आहे. सरकारने या मिलेट्सना श्री अन्नच्या रुपाने नवी ओळख दिली आहे. आता तुम्हाला श्री अन्नचा ब्रॅण्ड अम्बेसेडर बनायचं आहे. यामुळे तुमचं आरोग्यही सुधारेल आणि देशातील शेतकऱ्यांचंही भलं होणार आहे असंही मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पूजाविधी केला व त्यावेळी उपस्थित ब्रह्मवृंदाचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदी यांनी केलेला पुराणोक्त संकल्प संस्कृतमध्ये असून, त्याचा मराठी भावानुवाद पुढील प्रमाणे.

राम मंदिर सोहळ्याचे कार्य निर्विघ्नपणे संपन्न व्हावे : "माझ्याकडून भारतमातेची कायम सेवा घडो. भारताच्या शत्रूचे प्रयत्न निष्प्रभ करण्याचे आणि भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे बळ मला मिळो. माझ्या हातून सतत देव, देश आणि धर्मकार्य घडो. भारतातील प्रत्येक घटकाची माझ्या हातून सेवा घडो. कृषिप्रधान भारत सुयोग्य पर्जन्यवृष्टी द्वारा सुजलाम् सुफलाम् होवो. भारतावर अनारोग्याचे संकट कधीही न येवो. सर्व भारतीय जीवांचे कल्याण घडवण्यासाठी माझ्या हातून सतत कार्य घडावे. यासाठी माता गोदावरी, भगवान कपालेश्वर सहित सर्व इष्ट देवतांनी मला बल प्रदान करावे.'' विशेष म्हणजे या संकल्पाच्या निमित्ताने, ''आयोध्येत होऊ घातलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे कार्य निर्विघ्नपणे संपन्न व्हावे ''असे आशीर्वादही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प करताना सर्व देवतांकडे मागितले आहेत.

हेही वाचा :

1 मुंबईतील अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

2 सक्रिय राजकारणात सहभागी व्हा, घराणेशाही संपवा-पंतप्रधान मोदींचं युवकांना आवाहन

3 नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, काळाराम मंदिरात घेतलं दर्शन

Last Updated : Jan 12, 2024, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.