ETV Bharat / state

नाशिक पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी, जिल्ह्यात 20 बाधितांचा मृत्यू - malegaon corona update

नाशिकच्या मालेगाव येथे कोरोनामुळे सुरु असलेल्या टाळेबंदीत बंदोबस्तावर कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे यापूर्वी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

edited photo
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : May 9, 2020, 7:44 PM IST

नाशिक - मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या 51 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नाशिक पोलीस दलातील हा पहिला बळी असून नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून आता जिल्ह्यात 622 जणांना कोरोनाची लागण झाली असून 20 जणांचा यात मृत्यू झाला आहे. ह्या कोरोनाची लागण सर्वसामान्य नागरिकांसोबत मालेगाव येथे आपले कर्तव्य बजावणाऱ्या 70हुन अधिक लोकांना लागण झाली आहे.

नाशिकच्या कोणार्क नगर भागात राहणारे पोलीस कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून मालेगाव येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते. त्यांचा 2 मे रोजी कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आल्याने तत्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड कक्षात दाखल करण्यात आले होते.

डॉ. चेवले यांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, आज (दि. 9 मे) रोजी पहाटे त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व त्यांचा शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाशी मुकाबला करताना तब्बल 71 पोलीस अधिकारी 577 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 6 वर पोहोचली आहे. यापूर्वी मुंबई पोलीस दलातील 3, पुणे पोलीस दलातील 1 व सोलापूर शहर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांना बांधावरच खते आणि बियाणांचे वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.