ETV Bharat / state

नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा - market

पण, यावर्षी कांद्याला ८५० रुपये प्रती क्विंटल भाव आले आहेत. त्यामुळे शेतकऱयांसाठी ही आनंदाची बाब आहे. कांदा व्यापारी राजू मोराडे म्हणाले, की यावर्षी कांद्याला पोषक वातावरण होते. त्यामुळे कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे.

कांद्याचे दर वाढले
author img

By

Published : Mar 27, 2019, 2:59 PM IST

नाशिक - राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील तप्त उन्हामुळे तेथील कांदा खराब झाला आहे. त्यामुळे नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. त्याचबरोबर कांद्याचे भाव वाढले असून, ते ८५० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कांद्याचे उत्पादन कमी राहील त्यामुळे दर चांगले मिळतील अशी शक्यता आहे

मागील वर्षी कांद्याला ४०० ते ५०० रुपये क्विंटल भाव होता. शेतकऱ्याला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदा विकला नाही. दरवाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण, वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकऱयांना कवडीमोल भावात कांदा विकावा लागला. त्यामुळे मागचे वर्ष कांदा उत्पादकांसाठी डोळ्यात आसवे आणणारे ठरले.

पण, यावर्षी कांद्याला ८५० रुपये प्रती क्विंटल भाव आले आहेत. त्यामुळे शेतकऱयांसाठी ही आनंदाची बाब आहे. कांदा व्यापारी राजू मोराडे म्हणाले, की यावर्षी कांद्याला पोषक वातावरण होते. त्यामुळे कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. नाशिकचा कांदा चवीला चांगला असतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रतून त्याला मागणी असते. त्याचबरोबर इतर प्रांत आणि विदेशता देखील या कांद्याला मागणी असते. उन्हाळ्यात कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते.

Intro:कांद्याच्या दराने 850 टप्पा ओलांडला असुन राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये कडक उन्हामुळे कांदा खराब झाला आहे नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली असुन 850रुपये किट्टल कांदाच्या भाव झाला आहे पुढिल काहि दिवसात उन्हाळी कांदाचे दर वाढतील अशी शक्यता आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन पुढिल काहि दिवसात येतील अशी अपेक्षा आहे

Body:मागील वर्षी कांदाला 400 ते 500रू किट्टल भाव होता शेतकऱ्याला अपेक्षित दर न भेटल्याने शेतकऱ्यांनी कांदा विकला नाही तेव्हा काही दिवसांनी अपेक्षित भाव वाढ झाली नही तेव्हा वर्षांपासून साठवलेल्या उन्हाळी कांदा दीडशे ते दोनशे रुपये क्विंटल या दराने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावा लागल

Conclusion:राजुशेठ मोराडे कांदा व्यापारी याच्या म्हणन्या नुसार
ह्यावर्षी कांद्याला जे पोषक वातावरण हवे असते ते पोषक वातावरण ह्यावर्षी होते त्यामुळे कांद्याची कॉलिटी पण फार सुंदर झालेले आहे इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र आणि नाशिक येथील कांदा खायला चांगला लागतो म्हणून परप्रांतात आणि विदेशात ह्या कांद्याची मागणी जास्त राहते सध्या उन्हाळी कांदा हा बाजारात दाखल झाला असून पुढे भाव वाढण्याची शक्यता आहे सध्या उन्हाळी कांद्याचे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.