ETV Bharat / state

No Entry: नाशिकच्या इगतपुरीत पर्यटनासाठी येणाऱ्यांना पोलिसांकडून घरचा रस्ता - पर्यटन क्षेत्र बंद

महाराष्ट्रात काही भागात लॉकडाऊन शिथिल करताचा पर्यटक पर्यटन ठिकाणी धावू लागले आहेत. मात्र, नाशिकच्या इगतपुरी येथील भावली धरण, अशोका धबधबा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. येथे पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. शिवाय पर्यटकांवर कारवाईही केली जात आहे. त्यामुळे कोणीही पर्यटनासाठी येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Jun 14, 2021, 9:55 PM IST

नाशिक - इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी मज्जाव करत घरचा रस्ता दाखवला आहे. कोरोनामुळे पर्यटन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने पर्यटन स्थळे अद्याप बंद ठेवली आहेत. त्यामुळे इगतपुरी पोलीस रस्त्यात नाकेबंदी करून पर्यटकांना अडवून परत पाठवत आहेत.

नाशिकमध्ये पर्यटकांना नो एंट्री

पर्यटकांवर होणार कारवाई

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच पर्यटन स्थळे बंद आहेत. आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या इगतपुरी तालुक्यामध्ये दरवर्षी अशोका धबधबा, भावली धरण क्षेत्रात पर्यटकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते. तर यंदा लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पर्यटकांची पावले इगतपुरीकडे वळू लागली आहेत. नाशिकसह इतरत जिल्ह्यातूनही अनेक पर्यटक इगतपुरीला येत असतात. परंतु इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरामध्ये जमावबंदी लागू केली आहे. कोणत्याही प्रकारे बाहेरील वाहनांनी गर्दी करू नये. तसेच पर्यटकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी भावली धरण प्रवेशद्वारावर मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. धरण परिसरात पर्यटक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील देण्यात आले आहेत.

मुंबईतील कुटुंबाला घरात राहण्याचा आला कंटाळा -

'गेल्या दोन महिन्यापासून कोरोनामुळे आमचे कुटुंब घरातच आहे. त्यामुळे घरातील सर्वजण कंटाळले होते. चेंज म्हणून आम्ही इगतपुरी येथे आलो. पावसाळ्यात या भागातील निसर्ग फार सुंदर असतो. डोंगर-दऱ्यातून वाहणारे धबधबे, हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करणारा आहे. आम्ही दरवर्षी या भागात येत असतो. मात्र, इच्छित स्थळी जाण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला आहे. त्यामुळे आम्ही परत मुंबईला चाललो आहे', असे मत एका पर्यटक कुटुंबाने व्यक्त केले आहे.

...अन्यथा कारवाई -

'कोरोनामुळे अद्याप पर्यटन स्थळावर जाण्यास नागरिकांना बंदी आहे. त्यामुळे आम्ही भावली डॅम, अशोका धबधबा या भागात जाण्यावर बंदी घातली आहे. त्यासाठी या भागात नाकेबंदी केली आहे. आम्ही नागरिकांना विनंती करतो की त्यांनी गर्दी करू नये. विनंती करूनही नागरिक ऐकत नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत', असे पोलीस निरीक्षक सुधीर नागरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - नाशिकप्रमाणे औरंगाबादेत आढळून आला 'चुंबक मॅन'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.