ETV Bharat / state

आई आपणच पप्पांकडे जाऊ म्हणाली मुलगी.. पती निधनाने निराश पत्नीची चिमुकलीसह आत्महत्या

author img

By

Published : Oct 3, 2021, 6:44 PM IST

कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर दुःखाच्या खाईत गेलेल्या पत्नीने आपल्या सात वर्षाच्या मुलीसह घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या विनयनगर भागात घडली आहे.

woman commits suicide
woman commits suicide

नाशिक - कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर दुःखाच्या खाईत गेलेल्या पत्नीने आपल्या सात वर्षाच्या मुलीसह घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या विनयनगर भागात घडली आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून आत्महत्येचे कारण समोर आले आहे.

नाशिकच्या विनय नगर येथे मायलेकीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुजाता प्रवीण तेजाळे (वय 36 वर्ष ) आणि नयना प्रवीण तेजाळे वय( 7 वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. मायलेकीने घराच्या हॉलमध्ये छताला असलेल्या हुकला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. सुजाता यांचे दीर अशोक तेजाळे घरी आले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी तात्काळ दोघींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले.

हे ही वाचा -"राजा शेतकरी रडला"... पावसाने शेतकरी बेहाल, पोलिसाचं ह्रदय पिळवटणारं गाणं व्हायरल

सुसाईड नोटमध्ये लिहिले आत्महत्येचे कारण -

माझे पती प्रवीण तेजाळे कोरोनामुळे आम्हला अचानक सोडून गेले. तेव्हापासून माझे आयुष्य संपले. आता कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही, परंतु एवढे दिवस मुलीसाठी काढले. पण तिलाही वडिलांची खूप आठवण येते. बऱ्याच वेळा तिला समजून सांगितले पप्पा कधीच येणार नाही. पण ती आज सकाळी म्हणाली, चल आपण पण पप्पाकडे जाऊन स्टार होऊन राहू. या प्रश्नावर खूप विचार करून हा निर्णय घेतला. मला काही झाले तर तिचे काय होणार, पुढे आमच्या आयुष्यात खुशी नसताना जगण्याचा अर्थ काय, आयुष्यात पैसा सर्वकाही नसतो असे आयुष्य काढणे खूप कठीण आहे.

woman commits suicide
महिलेने लिहिलेली सुसाईड नोट

जसा जन्म देताना त्रास झाला तसा मन घट्ट करून मृत्यू देणार आहे आणि ते करताना तिला सांगणार आहे पप्पाकडे चाललोय. यात मी जन्म देती वैरिण नाही, या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून बराच विचार करून, तिला जसा जन्म दिला तसेच तिची काळजी करुन तिला घेऊन चालले आहे. आई-बापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवायही अर्थ नाही. अशी सुसाईड नोट सुजाता प्रवीण तेजाळे यांनी लिहिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.