ETV Bharat / state

नाशिक-पुणे रेल्वेमार्गामुळे नाशिकसह पुणे, अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला मिळणार चालना - छगन भुजबळ - नाशिक-पुणे रेल्वेमार्ग

पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार असल्याने या शहरांच्या विकासात आर्थिक भर पडणार आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
author img

By

Published : May 31, 2021, 7:37 PM IST

नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार असल्याने या शहरांच्या विकासात आर्थिक भर पडणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व मान्यता मिळाल्या असून, या द्रृतगती रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरू करण्यात येत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भुसंपादनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे व्यवस्थपकीय संचालक सचिन कुलकर्णी, उप जिल्ह्याधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, नाशिक-पुणे सेमी हास्पीड रेल्वे मार्ग हा देशातील पहिलाच मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी 16 हजार 39 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, 235 कि.मी. ग्रीन फील्ड सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वेमुळे अवघ्या पावणे दोन तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी रेल्वे लाईनची रचना करणारे महारेल हे पहिले महामंडळ असणार आहे. या तिन्ही जिल्ह्यांबरोबर इगतपुरी ते मनमाड सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे.

भुसंपादनासह हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, प्रतितास २०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे. पार्सल व्हॅनची सुविधा असलेला हा रेल्वेमार्ग नाशिकला ओझर आणि पुणे विमानतळाशी जोडलेला असल्यामुळे कार्गो वाहतुकीशी जोडला जाणार आहे. नाशिक रोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, दोडी, पलसखेडे, सोनेवाडी, संगमनेर, अंभीरे, साकूर, जांबूत, बोटा, आळे फाटा, भोरवाडी, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, वाघोली, केलवडी, मांजरी, हडपसर, पुणे अशा चौदा स्थानकाचा समावेश असलेल्या या रेल्वे मर्गावर प्रवाशी वाहतूकीला गती येणार आहे. तसेच या द्रृतगती मार्गावर असणारे सर्व स्थानके सर्व सोयीयुक्त असावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागाला सुचित केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.