ETV Bharat / state

बडगाममधल्या MI-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा जवान निनाद मांडवगणे हुतात्मा - हवाई दल

जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये झालेल्या हवाई दलाच्या दुर्घटनेत नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) हे हुतात्मा झाले आहेत.

हवाई दलाच्या दुर्घटनेत निनाद मांडवगणे हुतात्मा
author img

By

Published : Feb 27, 2019, 11:44 PM IST

नाशिक - जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) हे हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या मागे पत्नी लखनऊच्या विजेत्या, दोन वर्षाची कन्या, बँकेतून निवृत्त झालेले आईवडिल आणि जर्मनीतील धाकटा बंधू असा परिवार आहे

शहरातील डीजीपीनगर-१ मधील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटीमधील बॅंक ऑफ इंडिया कॉलनीतील १२ क्रमांकाच्या बंगल्यात मांडवगणे कुटुंबीय राहतात. निनाद यांचा जन्म १९८६ मध्ये झाला असून त्यांचे ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण भोसला मिलीटरी स्कूलमध्ये झाले. ११ वी, १२ वीचे शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या सैनिकी पूर्व संस्थेतून पूर्ण केले. ते २६ व्या अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी बी. ई. मॅकेनिकल ही पदवी घेतली असून त्यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीमध्ये झाली.

हैदराबादमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यावर २४ डिसेंबर २००९ मध्ये ते भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाले. २४ डिसेंबर २०१५ मध्ये त्यांची निवड स्कॉड्रन लिडरपदी झाली. गुवाहाटी, गोरखपूरमधील सेवा झाल्यावर आता त्यांची श्रीनगरमध्ये नेमणूक होती.

आई- वडील लखनऊमध्ये

निनाद यांच्या आई बँक ऑफ इंडियामधून तर वडील सिंडीकेट बॅंकेतून निवृत्त झाले आहेत. कौटुंबिक कारणास्तव ते लखनऊला गेले. उद्या रात्री ते परत नाशिकला येणार आहेत. भारतमातेच्या प्रेमाने भारावून गेलेली कुटुंबातील सदस्य सोडून गेल्याने मांडवगणे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

undefined

* जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (वय 33) हे शहीद झाले आहेत. त्यांच्या मागे पत्नी लखनऊच्या विजेता, दोन वर्षाची कन्या, बॅंकेतून निवृत्त झालेले वडील अनिल, आई सुषमा, जर्मनीतील धाकटा बंधू असा परिवार आहे. शहरातील *डीजीपीनगर -१*  एक मधील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटीमधील *बॅंक ऑफ इंडिया कॉलनीतील* बारा क्रमांकाच्या बंगल्यात मांडवगणे कुटुंबिय राहतात. निनाद यांचा जन्म 1986 मध्ये झाला असून त्यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण भोसला मिलीटरी स्कूलमध्ये झाले. अकरावी, बारावीचे शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या सैनिकी पूर्व संस्थेतून पूर्ण केले. ते 26 व्या अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी होत. त्यांनी बी. ई. मॅकेनिकल ही पदवी घेतली असून त्यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीमध्ये झाली. हैदराबादमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 24 डिसेंबर 2009 मध्ये भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाले. 24 डिसेंबर 2015 मध्ये त्यांची निवड स्कॉड्रन लिडरपदी झाली. गुवाहाटी, गोरखपूरमधील सेवा झाल्यावर आता त्यांची श्रीनगरमध्ये नेमणूक होती. आई- वडील लखनऊमध्ये 
निनाद यांच्या आई बॅंक ऑफ इंडियामधून, तर वडील सिंडीकेट बॅंकेतून निवृत्त झाले आहेत. कौटुंबिक कारणास्तव ते लखनऊला गेले आहेत. उद्या (ता. 28) रात्री ते परत नाशिकला येणार आहेत. भारतमातेच्या प्रेमाने भारावून गेलेली कुटुंबातील सदस्य सोडून गेल्याने मांडवगणे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.