ETV Bharat / state

नाशिक : डेटिंग अ‌ॅपवरून महिला असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक, व्यापाऱ्याला 19 लाखांना चुना - Nashik dating app Fraud news

परदेशी कंपनीत कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याच्या बदल्यात कमिशन देण्याच्या बहाण्याने नाशिकमधील व्यापाऱ्याची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. डेटिंग अ‌ॅपद्वारे महिला असल्याचे भासवून व्यापाऱ्याला 19 लाख रुपयांना चुना लावल्याचे उघड झाल्यानंतर सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी दिल्ली येथून एका नायजेरियन नागरिकासह दोघा संशयितांना अटक केली. नागरिकांनी डेटिंग अ‌ॅपचा वापर करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Pretending to be a woman from a dating app

नाशिक ऑनलाइन फसवणूक न्यूज
नाशिक ऑनलाइन फसवणूक न्यूज
author img

By

Published : Dec 4, 2020, 2:41 PM IST

नाशिक - फार्मास्युटिकल कंपनीला आवश्यक असलेले कच्चे तेल भारतातून नेदरलँडस् येथे पाठविण्याच्या मोबदल्यात मोठे कमिशन देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील व्यापाऱ्यास तब्बल १९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी दिल्लीस्थित नायजेरियन तरुणासह अन्य एकास बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नाशिक ऑनलाइन फसवणूक न्यूज
नाशिक ऑनलाइन फसवणूक, पोलीस सायबर सेल पत्रकार परिषद
डेटिंग अ‌ॅपवरून महिला असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक, व्यापाऱ्याला 19 लाखांना चुना

डेटिंग अ‌ॅपच्या माध्यमातून अनेकांची ऑनलाइन फसवणूक

ऑनलाइन डेटिंग अ‌ॅपच्या माध्यमातून अनेकांची ऑनलाइन फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.असाच आणखी एक प्रकार नाशिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. टुली मॅडली या डेटिंग अ‌ॅपवरून महिला असल्याचे भासवत सायबर चोरट्याने नाशिकच्या एका व्यापाऱ्याशी मैत्री केली. मोनिका सिंग असे या कथित महिलेचे नाव होते. तिने आपण नेदरलँडस् येथील अ‌ॅमस्टरडॅम याठिकाणी राहायला असून याठिकाणी असलेल्या बोरटॅड फार्मास्युटिकल नावाच्या कंपनीमध्ये असिस्टंट प्रोडक्शन अ‌ॅनालिस्ट असल्याचे सांगितले. व्यापाऱ्याचा विश्वास संपादित केल्यानंतर या कथित महिलेने आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी रॉ मटेरियलची गरज असल्याने सुरवातीला तिने शहरातील व्यापाऱ्याकडून सहा लिटर ऑइल कुरियरद्वारे मागवले. त्यानंतर पुन्हा मोनिकाने २०० लिटर ऑईलची मागणी केली. यावेळी तिने कमिशनचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरायला सांगितले. यात तिने व्यापाऱ्याला १९ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातला होता.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यापाऱ्याने सायबर पोलिसांत धाव घेत प्रकरणाची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर दिल्लीला पथक रवाना करून दिल्लीमध्ये सापळा रचत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील एक जण हा नायजेरियन असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

हेही वाचा - ओटीपी सांगणे पडले महागात! चारशे रुपयाच्या चप्पल खरेदीत डॉक्टरांना लाखाचा ऑनलाईन गंडा

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

यात नाशिक शहराच्या सायबर पोलिसांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रथमच सायबर गुन्हा केल्याप्रकरणी नायजेरियन गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. संशयित व्हिक्टर डॉमिनिक ओकॉन आणि त्याचा साथीदार पवनकुमार हरकेश बैरव यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील इतरही संशयितांना लवकरच पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, नागरिकांनीदेखील डेटिंग अ‌ॅपचा वापर करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा - विधानसभा अधिवेशन दोनच दिवसाचे; सरकार चर्चेतून पळ काढत असल्याचा फडणवीसांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.