ETV Bharat / state

नाशिक : रॅगिंग करुन मित्राची हत्या, इंजिनिअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल - रॅगिंग करुन मित्राची हत्या

बॅचमेट मित्राची रॅगिंग करुन त्याची हत्या केल्याप्रकरणी 7 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सातपूरजवळील संदीप फाऊंडेशन अभियांत्रिकी महाविद्यालयातील हे प्रकरण आहे. अंकित दिनकर महानकर असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 15 मार्च 2019 रोजी अंकितचा मृतदेह सापडला होता.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Aug 19, 2021, 4:11 AM IST

नाशिक - सातपूरजवळील संदीप फाऊंडेशन अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुण-तरुणींनी आपल्याच बॅचमेट मित्राची रॅगिंग करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी 7 विद्यार्थ्यांविरुद्ध सातपूर पाेलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकितच्या आईकडून प्रकरणाचा पाठपुरावा

15 मार्च 2019 रोजी अंकित दिनकर महानकर (२२, रा. विठ्ठलनगर,जिल्हा अकोला ) या महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृत मुलाची आई प्रमिला यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात पाठपुरावा केला.

7 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी याच महाविद्यालयात शिक्षण घेणारे अंकितचे बॅचमेट संशयित ऋचा महेंद्र भारती, नमित राधेरमण मिश्रा, संचित सारणी, दीपकुमार गोपाल झा, ऋषभराज विरेंद्रकुमार सिन्हा, लक्ष ललित जस्वाल, मोनिका सुरेश वळवी, ऋषिकेश विश्वनाथ दराडे यांच्यावर अंकितचा छळ करुन त्याला व्यसन करायला भाग पाडून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अंकितचे नेहमीच भांडण होत असल्याने संगनमत करून संशयितांनी त्याची हत्या केल्याचा गुन्हा या 7 जणांवर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक तुळशीराम राठोड करत आहेत.

हेही वाचा - आयुष्य खूप सुंदर आहे, पण माझ्या आयुष्यात त्रास आहे; फेसबुक पोस्ट करून छावा संघटनेच्या तालुकाध्यक्षाची एसटीखाली आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.