ETV Bharat / state

अंजेनेरी येथील हनुमान जयंती व बेझे येथील शिलाईमाता यात्रा उत्सव रद्द - corona effect

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यात्रा-उत्सव रद्द - हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या अंजनेरी येथील हनुमान जयंती उत्सव रद्द - बेझे येथे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी होणारी शिलाईमाता यात्राही रद्द

हनुमान जयंती
हनुमान जयंती
author img

By

Published : Apr 4, 2020, 11:20 AM IST

नाशिक - कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर श्री हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या अंजनेरी येथील हनुमान जयंती उत्सव रद्द झाला आहे. तर, याच्या दुसऱ्या दिवशी बेझे येथे होणारी शिलाईमाता यात्राही रद्द करण्यात आली आहे.

या वर्षी ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यात्रा रद्द करण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. अंजनेरी आणि बेझे येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली आहे. भाविकांना यंदा अंजनेरी व बेझे येथे न येण्याचे आवाहन अंजनेरीच्या सरपंच पुष्पा राजू बदादे आणि बेझे येथील सरपंच कविता बदादे यांनी केले आहे.

अंजेनेरी येथे हनुमान जयंती यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. येथे हजारो भाविक येतात. सध्या काही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. भाविकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन अंजेनेरी येथील सरपंच पुष्पा राजू बदादे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.