नाशिक - खोटं बोलून मते मागणे ही काँग्रेसची जुनी वृत्ती असल्याचे वक्तव्य पंतपर्धान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच देशाच्या चौकीदाराचा आत्मसन्मान हा मतदारांच्या हातात असल्याचे मोदी म्हणाले. नाशिकमध्ये आयोजीत प्रचारसभेत मोदी बोलत होते.
शेतकरी आणि बाजारपेठ यातील मध्यस्थ दलाल हे कायम फायद्यात होते. त्यांना आम्ही धक्का दिल्याचे मोदी म्हणाले. लोकांच्या आशीर्वादाने भाजपचे सरकार सत्तेवर आले होते. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची आमची वृत्ती आहे. ही हिम्मत मतदारांनी दिली असल्याचे मोदी म्हणाले.
श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब स्फोटाचा पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दात निषेध केला.
2014 पूर्वी देशात अतिरेकी हल्ले होत होते. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते. तेव्हा फक्त श्रद्धांजली वाहणे आणि पाकिस्तानच्या नावाने रडणे एवढच चालू होते. मात्र, या चौकीदारने त्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. अतिरेक्यांना पाताळात शोधूनही सजा देणार असल्याचे मोदी म्हणाले.