नाशिक - नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी 17 पैकी 6 जागा जिंकून शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे, याठिकाणी भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले असून विशेष म्हणजे दिंडोरी हा भारती पवार यांचा मतदारसंघ आहे.
दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक डॉ. भारती पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती, त्यांचा मतदारसंघ असल्याने त्या याठिकाणी तळ ठोकून होत्या. नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी भागात अनेक वर्षे काम केले आहे, त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. येथे नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांपैकी 6 जागा मिळवत शिवसेनेने एक नंबर पक्ष ठरला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने 5, काँग्रेसने 2 आणि भाजपाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता आहे. देशात मोदी लाट असताना पवार यांना नगरपंचायत निवडणूकीत धक्का बसल्याने सर्वत्र चर्चेचा विषय होत आहे.
निफाडमध्ये भाजपला धक्का..
निफाड मध्ये भाजपची सत्ता उलथली आहे, या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला असून एकूण 17 जागांपैकी शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 3,शहर विकास आघाडीला 4, बसपाला एक जागा आणि 1 जागा अपक्षला मिळाली आहे.
कळवण राष्ट्रवादीच्या ताब्यात -
कळवण ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉग्रेसचे वर्चस्व राहिले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना त्यांचे दीर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांनी धोबीपछाड दिला आहे. एकूण 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस 9, भाजप 2, काँग्रेस 3, शिवसेना 2 आणि एक जागा मनसेने पटकावली आहे.
देवळात भाजप एक नंबर पक्ष -
देवळा नगरपंचायतीत भाजप एक नंबर पक्ष ठरला आहे. या ठिकाणी 17 जागांपैकी भाजपाने 15 जागांवर यश मिळवले आहे, तर अवघ्या दोन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला समाधान मानावे लागले
सुरगाणामध्ये कमळ फुलले -
सुरगाणा नगरपंचायतीमध्ये एकूण 17 जागा आहेत. त्यातील सर्वाधिक 8 जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला आहे, त्यानंतर शिवसेनेला 6 आणि कम्युनिस्ट पक्षाला 2 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. याठिकाणी माकप किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे
पेठ मध्ये सेनेला धक्का -
पेठ नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आले आहे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला असून, एकूण 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस 8, शिवसेना 4,भाजप 1 अपक्ष 1 जागांवर विजयी झाले.
Nagar Panchayat Result : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना धक्का.. देवळा, सुरगाणात भाजपचा गुलाल
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी 17 पैकी 6 जागा जिंकून शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे, याठिकाणी भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले असून विशेष म्हणजे दिंडोरी हा भारती पवार यांचा मतदारसंघ आहे.