येवला (नाशिक)- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून येवल्यातील मुस्लीम बांधवांनी आपापल्या घरात राहूनच नमाज अदा केली. सध्या देशावर कोरोना संसर्गाचे सावट असल्याने सरकारने देशात टाळेबंदी लागू केली आहे.सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर देशातील सर्व प्रार्थना स्थळे बंद करण्यात आले आहेत.तर दुसरीकडे मुस्लिम धर्मगुरूंनी व पोलीस प्रशासनाने देखील रमजान ईदची नमाज घरातच अदा करण्याचे आवाहन केले होते. यामुळे येवला शहरांतील सर्व मुस्लीम बांधवांनी नमाज घरातच पठण करून ईद साधेपणाने साजरी केली.
शहरातील ईदगाह मैदानावर ईदचे सामूहिक नमाज पठण केले जात असते. मात्र, कोरोनाच्या प्रदूर्भवामुळे मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी न येता घरातच नमाज पठण करून ईदच्या शुभेच्छा सामाजिक अंतर ठेवून दिल्या आल्या.
ईदगाह मैदानावर कोरोना संसर्ग लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा, महसूल अधिकारी यांचा मुस्लिम समाजाच्यावतीने पुष्पवृष्टी करुन टाळ्या वाजवून सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, तहसीलदार रोहीदास वारुळे, अँड.माणिकराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे,तालुका वैद्यकीय अधिकारी गायकवाड, डॉ. सुशांत पाटील, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी,सह अकबर शाह, नगरसेवक अमजद शेख,एजाज शेख, निसार शेख , आलमगीर शेख, अनिस शेख, नसीर शेख,आदी उपस्थित होते.