ETV Bharat / state

MODI Cabinet Expansion : दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार मोदी टीममध्ये सामील.. जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

author img

By

Published : Jul 7, 2021, 5:02 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. प्रशासनाकडून मंत्र्यांच्या नावाची यादी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नेत्या भारती पवार यांचे नाव सामील करण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात अनेक तरूणांना संधी देण्यात आली आहे.

MODI Cabinet Expansion
MODI Cabinet Expansion

नाशिक - आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. पवार यांचे मंत्रिमंडळ विस्तारात यादीत नाव असल्याने त्या आज शपथविधी घेणार आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजप महिलांचा सन्मान करणारा पक्ष असल्याचे सूचक वक्तव्य भारती पवार यांनी केले होते. त्यांचा मोदी टीममध्ये समावेश झाल्याने उत्तर महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोण आहेत डॉ. भारती पवार -

जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे काम आहे. स्वत: डॉक्टर असल्याने एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा आहे. भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले आहे. डॉ भारती पवार यांनी 5 जुलै 2019 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवारांचे निकटवर्तीय ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत. भारती पवार राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या.

ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि काम आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना, लाखांच्या घरात मते त्यांनी मिळवली. 2019 च्या निवडणूकीत राष्ट्रवादीने उमेदवार आयात केल्याने ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्याने त्या दिंडोरी मतदारसंघातून सहज निवडून आल्या.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश -

भारती पवार यांनी 5 जुलै 2019मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील लाखांच्या घरात मतदान घेणाऱ्या भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्ती ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत. त्यामुळे भारती पवारांच्या निमित्तानं भाजपनं उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक मोठं घराणं गळाला लावल्याचं बोललं जात होतं. मुंबईत भाजप प्रवेशांनंतर भारती पवार यांनी पक्ष देईल ती जवाबदारी पार पाडू असं सांगितलं. भाजप महिलांचा योग्य सन्मान राखणारा पक्ष असल्याचं सूचक वक्तव्य भारती पवार यांनी केलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.