नाशिक - महाविकास आघाडीचे कार्यकर्तेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे उल्लंघन करत असल्याचे मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत असून त्यांची मला काळजी वाटते, असे म्हणत पक्षाला आमदार रोहित पवार यांनी घरचा टोला लगावला आहे.
नियम पाळायला हवे
रोहित पवार हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून शहरात ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी कार्यालयात तर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीसाठी तुफान गर्दी केली होती. सरकारने घालून दिलेल्या सामाजिक अंतर या नियमाचा फज्जा येथे उडाला त्याचबरोबर अनेकांनी मुखपट्टीही (मास्क) तोंडाला लावलेली नव्हती. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आनंद होतो आणि काळजीही वाटते. त्यांनी नियम पाळायला हवे.
कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याचा आनंद
सर्व कार्यकर्ते लोकांच्या हितासाठी कोरोना काळात काम करत होते, याचा मला आनंद आहे. त्यांना मी गर्दी करू नका, मास्क वापरा, अशा सुचना करत होतो. पण, ते ऐकतच नसल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा - सरकार पाडण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना पाच वर्षे उलटून गेलेली कळणार नाही- रोहित पवार
हेही वाचा - कोरोना मुळे हज यात्रेसाठी भाविकांचा अल्प प्रतिसाद