नाशिक - मामा-भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना म्हसरुळ परिसरात घडली आहे. चुलत मामाने 13 वर्षीय भाचीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाच्या या कृत्यामुळे भाची चार महिन्यांची गर्भवती आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्च रोजी 13 वर्षांच्या भाचीला मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने घराच्या हॉलमध्ये नेले. तिच्यावर बळजबरीने दुष्कृत्य केले. याबाबत कोणालाही सांगू नको अन्यथा कुटुंबियांसह तुला ठार मारेन अशी धमकी मामाने दिली.
मामाच्या धमकीने भाचीने झालेल्या प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, काही दिवसानंतर पीडितेला उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- 'महाविकास आघाडी सरकार कोरोनाशी नाही तर आकड्यांशी लढतेय'