येवला ( नाशिक ) - ऊर्जा संकट फक्त महाराष्ट्रापुरते नसून संपूर्ण देशात आहे. सद्या गुजरात, कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यात लोडशेडिंग मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. यामुळे सर्वांनी खरी माहिती घेऊन मग यावर बोलावे, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येवल्यात म्हटले.
प्रकाश आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो - आंबेडकर साहेबांनी संपूर्ण माहिती घेऊन यावर खरे बोलणे अपेक्षित आहे. कारण मी प्रकाश आंबेडकरांचा आदर करतो. फक्त महाराष्ट्र शासनाला दोष देण्यापेक्षा केंद्र शासनाने कोळशाचे नियोजन केले तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये हे संकट टळेल. दोन दोन महिने पुरेल एवढाच कोळसा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साठवावे लागतो पण तसे होताना दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा नंतर आणखी हे संकट गडद देखील होऊ शकतो. यासाठी फक्त केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. महाराष्ट्र शासनावर टीका विरोधकांनी करण्यापेक्षा अधिक केंद्रांनी कोळशाची परिस्थितीही व्यवस्थित करावी, अशी प्रतिक्रिया ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.