ETV Bharat / state

लॉकडाऊन ३.० : स्थलांतरित मजुरांची पायपीट सुरुच - Corona Virus news

मनमाड मार्गे रोज अनेक कामगार मध्य प्रदेश, राजस्थान कडे पायी जात आहेत. मनमाड शहरातील गुरुद्वारा मार्फत रोज पायी जाणाऱ्या मजुरांना जेवण दिले जात आहे.

Manmad
स्थलांतरित मजुरांची पायपीट सुरुच
author img

By

Published : May 7, 2020, 10:47 AM IST

मनमाड (नाशिक) - संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे महामारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, अचानक घ्याव्या लागलेल्या निर्णयामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यात आलेल्या परप्रांतीय मजुरांची स्थिती विदारक आहे. रोजगार बंद पडल्याने हजारो लोक पायीच गावाकडे निघाले आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाल्यानंतरीही मजुरांची पायपीट सुरुच आहे.

स्थलांतरित मजुरांची पायपीट सुरुच

मनमाडमार्गे रोज अनेक कामगार मध्य प्रदेश, राजस्थान कडे पायी जात आहेत. मनमाड शहरातील गुरुद्वारा मार्फत रोज पायी जाणाऱ्या मजुरांना जेवण दिले जात आहे. सरकारने सर्वांना आहे, तिथेच थांबण्याची सूचना केली आहे. मजुरांची जेवणाची व्यवस्था करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आल्यामुळे मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री सुमारे 35 ते 40 मजूर लासलगाव येथून 25 किलोमीटरचे अंतर कापून मनमाडला आले होते. तर काही मजूर हे औरंगाबाद येथून आले होते. या ठिकाणी मजुरांना गुरुद्वाराच्या लंगरमधून जेवण देण्यात आले. त्यानंतर हे सर्व मजूर रात्री अंधारातच मध्य प्रदेशातील आपल्या गावाकडे रवाना झाले.

देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी परतण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. रेल्वेने देशभरात 115 श्रमिक रेल्वे गाड्या पाठवून आत्तापर्यंत सुमारे 1 लाख स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मुळ राज्यात पोहोचवले आहे. मात्र, आजही ज्यांची नोंद नाही अशा लाखो मजुरांना पायपीट करत आपले गाव गाठावे लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.