ETV Bharat / state

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : कोरोनाकाळात मानसिक रुग्णांमध्ये मोठी वाढ - nashik breaking news

10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम वाढत असून देशात भारतासारख्या देशात मानसिक व्याधींनी ग्रस्त असलेले एकूण व्यक्ती पैकी 85 टक्के लोक उपचारापासून वंचित आहेत.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Oct 10, 2020, 10:58 PM IST

नाशिक - कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात अनेकांचे जीवनमान बदलून गेले आहे. अनेक जण बेरोजगार झाले असून याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाल्याने भविष्यात मानिसक रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. देशात कोरोनाचे संकट अजुनही कायम आहे. अशात सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचे आयुष्य बद्दल आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग धंदे बंद पडले आणि यामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा मुख्य प्रश्न त्यांना भेडसावत आहे. सरकारने अनलॉक सुरू केले असले तरी जनजीवन अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. अनेक या काळात अनेकजणांना आजाराची भीती, आर्थिक अडचणी, चिंता, काळजी, उदासीनता भेडसावत असून ह्याचा परिणाम नागरीकांच्या मानसिकतेवर झाला आहे.

कोरोनाचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम वाढत असून देशात भारतासारख्या देशात मानसिक व्याधींनी ग्रस्त असलेले एकूण व्यक्ती पैकी 85 टक्के लोक उपचारापासून वंचित आहेत. भारत देशात एकूण अर्थव्यवस्थेच्या 1 टक्के इतकी रक्कम आरोग्यासाठी ठेवली जाते. जागतीक आरोग्य संघटनेच्या एका सर्वेक्षणानुसार विकसनशील देशात आरोग्यावरील एकूण खर्चापैकी केवळ 1 टक्के मानसिक आरोग्यावर खर्च केला जातो. समाजातील 25 टक्के नागरिकांना कमी अधिक स्वरूपात लहान मोठे मानसिक आजार असताना निधीची तरतूद अत्यल्प असल्याचे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी व्यक्त केले आहे. सरकारने शहरात तसेच ग्रामीण भागातील सरकारी तसेच खासगी दवाखान्यात सर्वांना परवडणारी दर्जेदार, समाजहितावर आधारित मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध केली पाहिजे, असेही डॉ. सोननीस म्हटले आहे.

मानसिक रुग्ण व्यक्तीची कशी घ्यावी काळजी

मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला समजून घेतले पाहिजे. या व्यक्तींना समाजात नातेवाईकात, शेजारी-पाजारी, कामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे समावून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या मानसिक आजाराहून चेष्टा करू नये, सर्वांनी एकमेकांमध्ये सवांद वाढवणे गरजेचे आहे.

मानसिक आरोग्य दुर्लक्षित क्षेत्रापैकी एक

जगात 1 अब्ज लोक मानसिक विकृतीसह जगत आहे.

स्क्रीजोफेनिया सारख्या गंभीर मानसिक विकारामुळे ग्रस्त लोक सामान्य व्यक्तीपेक्षा 10-20 वर्षे आधी जीव गमावतात.

दरवर्षी 8 लाख लोक तर प्रत्येक 40 सेकंदाला 1 व्यक्ती जीवनाचा त्याग करतात.

यात सर्वाधिक 15 ते 29 वयोगटातील तरुणांचा समावेश आहे.

हेही वाचा - 'नाशकातील हाॅटेल, रेस्टारंट अन् बार रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.