नाशिक - मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारने मराठा समाजाला खूश करण्यासाठी अनेक घोषणा केल्या. मात्र, या घोषणा दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोप करत नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य ती भूमिका न घेतल्यास राज्यभर सुरू असलेले आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणाला सरकारच्या उदासीनतेमुळे न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज सरकारविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाची ही आक्रमकता बघून राज्य सरकारने मराठा समाजासाठी विविध योजना राबविण्याची घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत केलेल्या घोषणा समाजाची दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोप नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षण: 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक, कोल्हापुरात गोलमेज परिषदेत निर्णय
आज नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबत सरकारने वेळीच योग्य ती भूमिका न घेतल्यास राज्यभर सुरू असलेले आंदोलन पुढच्या काळात अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - 'मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसीच्या कोट्यातून नको'