मनमाड - डॉ. मोहन वारके हे 15 दिवस मालेगाव येथे कोरोना रुग्णालयात कर्तव्य बजावून परतल्यानंतर त्यांचे मनमाड उपजिल्हा रुग्णालयात स्वागत करण्यात आले. येथील सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय या सर्वांनी तसेच रुग्णालयात आलेल्या नागरिकांनी टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात असलेले वैद्यकीय अधिकारी यांची मालेगाव व नाशिक येथील कोव्हिड रुग्णालयात ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्ये १५ दिवस काम आणि त्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाईन, अशाप्रकारे सेवा बजावली जात आहे. असेच मनमाड उपजिहा रुग्णालयातील डॉ. मोहन वारके यांनी मालेगाव येथील जीवन रुग्णालयात 15 दिवस कर्तव्य व 14 दिवस क्वारंटाईन होऊन आज पुन्हा आपल्या रुग्णालयात कर्तव्यावर हजर झाले. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एस. नरवणे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले, तर येथील सर्व डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय यांच्यासह उपस्थित नागरिकांनी देखील डॉ. वारके यांच्यावर पुष्पवृष्टी करत व टाळ्या वाजवत स्वागत केले.
![manmad nashik latest news manmad doctor welcome news मनमाड नाशिक लेटेस्ट न्युज नाशिक कोरोना अपडेट nashik corona update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-drvarkecomebackinmanmad10031_16052020121009_1605f_1589611209_398.jpg)