नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरात संदल उरूसची अनेक वर्षांची परंपरा आहे, असे सांगून काही समाजकंटकांनी त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या प्रवेश द्वारावर पहिल्या पायरीवर धूप दाखविण्याच्या प्रकाराला धार्मिक रंग दिला. त्र्यंबकेश्वर परिसरात सामाजिक सलोखा, शांतता बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. अशा घटना त्र्यंबकेश्वर सह संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे, असे नितेश राणे यांचे म्हणणे आहे. या संदर्भात आमदार नितेश राणे, माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके त्र्यंबकेश्वर राजांची महाआरती केली आहे.
काय आहे प्रकरण : त्र्यंबकेश्वर येथे 13 मे रोजी रात्री ही घटना घडली होती. दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून त्र्यंबकेश्वर शहरात यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिराच्या परिसरात थांबली. देवाला धुप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तीन देवांची प्रतीके : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर महाराष्ट्र-प्रांतातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावात आहे. गोदावरी नदी जवळच्या ब्रह्मा गिरी पर्वतातून उगम पावते. त्र्यंबकेश्वर-पवित्र गोदावरीच्या उगमस्थानाजवळ वसलेल्या त्र्यंबकेश्वरलाही मोठे वैभव आहे. गौतम ऋषी आणि गोदावरीच्या प्रार्थनेनुसार भगवान शिव या ठिकाणी वास करून प्रसन्न झाले आणि त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. मंदिराच्या आत एका छोट्या खड्ड्यात तीन छोटी लिंगे आहेत, जी ब्रह्मा, विष्णू आणि शिव - या तीन देवांची प्रतीके मानली जातात. शिवपुराणानुसार ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी 700 रुंद पायऱ्या बांधल्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर 'रामकुंड' आणि 'लष्मणकुंड' भेटतात. शिखरावर गेल्यावर गोमुखातून भगवती गोदावरी बाहेर पडताना दिसते.
हेही वाचा : 1. Love Horoscope : 'या' राशीच्या प्रियकरांना मिळेल आनंदाची बातमी, वाचा लव्हराशी
2. Panchang : सूर्योदय आणि सूर्योस्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, जाणून घ्या आजचे पंचांग
3. Horoscope : 'या' राशींच्या लोकांच्या लोकप्रियतेत होणार वाढ; वाचा राशीभविष्य