नाशिक : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी आज त्यांची पत्नी आणि मुलांसह नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. (Shivraj Singh Chouhan in Trimbakeshwar). 'भारत विश्व मार्गदर्शक होवो', असे साकडे त्यांनी यावेळी त्र्यंबकेश्वराकडे घातले. चौहान यांनी यावेळी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्रंबकेश्वरचे दर्शन घेत अभिषेक पूजा देखील केली.
25 वर्षापासून दरवर्षी दर्शनासाठी येतात : मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे त्यांच्या कुटुंबीयांसह गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतात. तेथून ते त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन मध्यप्रदेशात परतात. त्यांची ही प्रथा त्यांनी कधीही खंडित होऊ दिली नाही. यावेळी त्यांनी भौतीक व आध्यात्मिक दृष्ट्या भारत बलशाली असून भारतीय जनता सुखी व समृद्धी होवो, अशी त्र्यंबकेश्वरच्या चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले. यावेळी भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून ती एका मजबूत ठिकाणी पोहोचली आहे, असेही ते म्हणाले.