नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी किसान सभेचा कळवण प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा - j p gavit
नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने आज कळवण येथील प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
नाशिक - आदिवासी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आज नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने कळवण येथील प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कळवण शहरापासून सुरू झालेला हा मोर्चा शहरापासून 4 किमी अंतरावर असलेल्या कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयावर नेण्यात आला.
पुनद धरणातून सटाणा शहराला जाणाऱ्या पाईपलाईनचे काम तत्काळ थांबवण्यात यावे, वन जमिनीधारकांच्या कायद्यात विपरीत दुरुस्ती रोखावी, दुचाकी धारकांचे पिवळे व केशरी हे सवलतीचे रेशन कार्ड रद्द करण्याचा कायदा मागे घ्यावा, पंतप्रधान आवास योजनेच्या आणि घरकुल योजनेचा लाभ सर्व गरीब वंचितांना देण्यात यावा, संजय गांधी योजनेच्या श्रावणबाळ वृद्धापकाळ निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. सरकारने किसान सभेच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्या, अशी मागणी यावेळी आमदार जे.पी. गावित यांनी केली.
माकपच्या केंद्रीय सदस्या वृंदा करात, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे.पी.गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी करात, ढवळे आणि गावित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोर्चाला मोठ्या संख्येने किसान सभेचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
बाईट-जे.पी.गावित,आमदारConclusion:कळवण शहरापासुन सुरु झालेला हा मोर्चा शहरापासुन चार किमी अंतरावर असलेल्या कोल्हापुर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयावर नेण्यात आला.वृंदा कारत,अशोक ढवळे,जे.पी.गावित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी मोठ्या संख्येने किसान सभेचे कार्यकर्ते,शेतकरी उपस्थित होते.