नाशिक - ऐतिहासीक वास्तूंचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या गोदावरीतील अनेक पुरांना पुरून उरणारा रामसेतू पूल ( Ram Setu bridge ) आज मात्र शेवटच्या घटका मोजतांना दिसत आहे. एकेकाळी रामसेतूसह गाडगे महाराज पुलाचे ( Gadge Maharaj bridge ) काम अवघ्या एक लाख १० हजार रूपयांमध्ये झालेले होते. त्यानंतर आता मात्र रामसेतू पूल क्षीण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा पूल सध्या नागरिक व रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.
स्ट्रक्चरल आँडिट केले जाणार - जिल्हाधिकारी,पालिका आयुक्त, यांनी केलेली पुलाची पहाणी,स्ट्रक्चरल आँडिट केले जाणार आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदामाई दुथडी ( godawari overflow ) भरून वाहते आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रामसेतूची मोठी दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांचा हक्काचा पूल असलेला रामसेतूने अनेक पूर पाहिले. साधारण 1955 च्या सुमारास या पुलाची निर्मिती झाली. त्यानंतर याच रामसेतूने 1969, 2008, 2016 आणि 2019 मध्ये आलेल्या महापूरांना लीलया पार केले आहेत. मात्र सद्यस्थितीत रामसेतू पूलच रामभरोसे असल्याचे दिसून आले आहे. हा पूल दुरुस्त करावा अशी नाशिकारांची मागणी आहे. पुल धोकादायक झाल्यानंतर जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांनी पुलाची पहाणी केली. स्ट्रक्चरल आँडिट केले जाणार असून पुढिल निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे.
अपघाताची भीती - बॅरिकेट्स ओलांडून नागरिक या पुलावरून पायी ये-जा करत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत हा पूल दोन्ही बाजूने ब्रॅकेट लावून बंद करण्यात आलेला आहे. हा पूल वाहतूकीसाठी तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक आहे. अशा प्रकारचे फलकदेखील या पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आले. मात्र असे असले तरी अनेक नागरिक हे बॅरिकेट्स ओलांडून या पुलावरून पायी ये-जा करत असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.