ETV Bharat / state

नाशिकमध्ये म्यूकरमायकोसिसच्या उपचारासाठी टास्क फोर्स तयार - नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनानंतर आता म्यूकरमायकोसिस आजार प्रचंड वेगाने वाढत आहे. नाशिकमध्ये म्यूकरमायकोसिसच्या उपचारासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

nashik
नाशिक
author img

By

Published : May 13, 2021, 9:32 PM IST

नाशिक - कोरोनानंतर आता म्यूकरमायकोसिस आजार प्रचंड वेगाने वाढत आहे. नाशिकमध्येही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसच्या उपचारासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी मॉडेल ऑपरेशन थिएटरची तातडीने निर्मिती करण्यात येणार आहे. याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

'कोरोनामुक्त रुग्णांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी'

'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. परंतु, काही रुग्णांना कोरोना उपचारानंतरच्या अनेक व्याधींचाही सामना करावा लागत आहे. त्यात प्रामुख्याने म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने अनेक रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी पोस्ट कोविड सेंटरवर कान, नाक, घसा तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. कोविड झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी. या आजाराचे गंभीर स्वरूप विचारात घेता, याकरता योग्य ती पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने टास्क फोर्सची स्थापना करावी. यात जिल्हा-मनपा रुग्णालय आणि खासगी डॉक्टरांचाही समावेश करण्यात यावा', अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्यूकरमायकोसिस आजाराचा समावेश

'महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्यूकरमायकोसिस आजाराचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय आणि खासगी डॉक्टरांच्या एकत्रित मदतीने यावर कामकाज करण्यात यावे. जनआरोग्य योजनेत कान, नाक व घसा यावर उपचार करणाऱ्या ज्या रुग्णालयांचा समावेश नाही, त्यांचा तातडीने समावेश करण्यात यावा. तसेच खासगी डॉक्टरांनी यामध्ये आपले योगदान द्यावे', असे आवाहनही या बैठकीत भुजबळांनी केले आहे.

'म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना या आजाराची बाधा होत आहे. सद्यस्थितीतील कोरोना उपचारांमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत. जेणेकरून या आजाराचा संसर्ग टाळता येईल. तसेच जिल्ह्यातील आजची वैद्यकीय व्यवस्था विचारात घेता त्यामध्ये अधिक काय सुधारणा करणे आवश्यक आहे, याबाबत टास्क फोर्सने सूचना कराव्यात', असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तसेच, कोरोना आजारातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरमधून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

म्यूकरमायकोसिससाठी अशी असेल टास्क फोर्स समिती

म्यूकरमायकोसिस टास्क फोर्सची समिती गठीत करण्याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश जाहिर केले आहेत. या टास्क फोर्स समितीमध्ये या विषयातील तज्ज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. पुष्कर लेले, डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. शितल गुप्ता, डॉ. भरत त्रिवेदी, डॉ. संजय बापये, महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महानगरपालिकेचे नोडल ऑफिसर कोरोना व्यवस्थापन डॉ. आवेश पलोड इत्यादी सदस्य आहेत. या समितीचे समन्वय म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात काम पाहणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त विषयाच्या आवश्यकतेप्रमाणे अधिक तज्ज्ञांना विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्याची मुभा समन्वयकांना असणार असल्याचेही मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा - अंबरनाथमध्ये 'सैराट'; प्रेमविवाह केल्याच्या वादातून तरुणाची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.