ETV Bharat / state

नाशिक : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत - नाशिक शेतकरी लेटेस्ट न्यूज

पाच दिवसापासून द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये ढगाळ वातावरण असून पिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा या पिकांवर रोगराई वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचा विपरीत परिणाम द्राक्ष बागांवर होत आहे. द्राक्ष उत्पादकांनी या वातावरणामुळे चांगलीच धास्ती घेतली आहे. ढगाळ वातावरण राहिल्यास द्राक्षफळांवर भुरी पडणे, पाने गळणे, वाढ खुंटणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

नाशिक द्राक्ष उत्पादक न्यूज
नाशिक द्राक्ष उत्पादक न्यूज
author img

By

Published : Dec 13, 2020, 4:01 PM IST

Updated : Dec 13, 2020, 4:11 PM IST

नाशिक - शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. गेल्या पाच दिवसापासून वातावरणातील वाढलेला गारवा आणि त्यातच रिमझिम पाऊस पडत असल्याने द्राक्षाच्या फळांवर परिणाम होऊ शकतो, अशी धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे.

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत

हेही वाचा - नवीन कृषी कायद्यांचा मराठी अनुवाद शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

पाच दिवसापासून द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये ढगाळ वातावरण असून पिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा या पिकांवर रोगराई वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचा विपरीत परिणाम द्राक्ष बागांवर होत आहे. द्राक्ष उत्पादकांनी या वातावरणामुळे चांगलीच धास्ती घेतली आहे. ढगाळ वातावरण राहिल्यास द्राक्षफळांवर भुरी पडणे, पाने गळणे, वाढ खुंटणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

नाशिक द्राक्ष उत्पादक न्यूज
नाशिक : द्राक्ष पीक

शनिवारी आणि रविवारी दुपारी पावसाने हलकी हजेरी लावल्याने रोगांपासून द्राक्ष बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच, कांदा पिकांवर करपा रोग पडण्याची शक्यता असल्याचे जाणकार शेतकरी सांगतात. आधीच कोरोना काळ आणि त्यात अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - 'शेतकऱ्यांची मागणी अयोग्यच; कृषी कायदे रद्द होणार नाहीत, मात्र त्यात सुधारणा अपेक्षित'

Last Updated : Dec 13, 2020, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.